बालगणेश अन् बाळू मामा.. 'या' मूर्तींना आहे कोल्हापूरकरांची पसंती
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोल्हापुरात घरगुती गणेशोत्सवासाठी वेगवेगळ्या रुपांतील बाप्पांना पसंती आहे.
advertisement
1/9

गणेशोत्सवाला अगदी काहीच दिवस बाकी राहिल्यामुळे कोल्हापुरात बाजारपेठा गर्दीने फुलून जात आहेत. कोल्हापुरात गणपती बाप्पाच्या विविध रूपांचे दर्शन कुंभार गल्ल्यांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.
advertisement
2/9
कुठे स्वामी समर्थ यांच्या रूपातील आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत आहे. तर कुठे चिंतामणी, कुठे विठ्ठल, तर कुठे भगवान शंकर, बाळकृष्ण अशा रूपातील गणेशमूर्ती विक्रीस ठेवण्यात आलेल्या आहेत.
advertisement
3/9
एके ठिकाणी कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाची प्रतिकृती, त्यामध्ये पोहणारे मूषक आणि कठड्यावर बसलेला बालगणेश अशी सुंदर मूर्ती पाहायला मिळत आहे. तर अजून एका ठिकाणी गजावर (हत्तीवर) आरूढ झालेली 3 फुटी गणेशमूर्ती देखील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
4/9
काही ठिकाणी उत्खननात सापडलेल्या किंवा पुरातन मंदिरात असतात तशा दुर्मिळ स्वरूपातील गणेशमूर्ती विक्रीला आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, गरुदेव दत्त, साईबाबा, बाळूमामा यांच्या रूपातील आकर्षक गणेशमूर्तीला देखील नागरिकांकडून जास्त मागणी असल्याचे पाहायला मिळते.
advertisement
5/9
यंदा शाडू माती आणि रंग यांचा दर त्याच बरोबर मजुरी वाढल्याने गणेश मूर्तींचे दर देखील 25 टक्क्यांनी वाढलेले आहेत, असे कुंभार बांधवाने सांगितले.
advertisement
6/9
कोल्हापूरच्या बाजारपेठेत वेगवेगळ्या रूपातील 1 फुटांपासून ते 3.5 फुटांपर्यंत उंचीच्या घरगुती गणेशमूर्ती विक्रीला आहेत.
advertisement
7/9
यामध्ये 1 फुटांच्या गणेशमुर्ती साध्या रूपात 600 ते 700 रुपयांना मिळते. तर दीड फुटांची गणेशमूर्ती 1600 रुपयांपासून 1800 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
advertisement
8/9
यापेक्षा मोठी 2 फूट उंच गणेशमूर्ती या 2500 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत मिळून जाते. तसेच 3 फूट घरगुती गणेशमुर्ती 3000 ते 3500 रुपयांना बाजारपेठेत विक्रीस ठेवण्यात आलेली पाहायला मिळते.
advertisement
9/9
कोल्हापुरात शाडूच्या पर्यावरणपूरक 1 ते 2 फूट उंचीच्या गणेशमूर्ती साधारण 1200 ते 3000 रुपयांना मिळत आहेत.