TRENDING:

Ginger Tea vs Lemongrass Tea : गवती की आल्याचा, आरोग्यासाठी कोणता चहा आहे 'नंबर 1'? फक्त चवच नाही तर 'या' गोष्टींही महत्वाच्या

Last Updated:
अनेककदा चहा संबंधीत अनेक प्रश्न, समज-गैरसमज लोकांमध्ये असतात. आज चहात 'आलं' टाकू की 'गवती चहा'? साहेबांना आल्याचा चहा आवडतो, तर सासूबाईंना गवती चहाचा सुवास हवा असतो. चवीसाठी तर आपण हे दोन्ही वापरतोच, पण आरोग्याच्या बाबतीत या दोनपैकी कोणाचं पारडं जड आहे?
advertisement
1/8
गवती की आल्याचा, आरोग्यासाठी कोणता चहा Best? फक्त चव नाही या गोष्टीही महत्वाच्या
सकाळचा तो पहिला चहा.... मन प्रसन्न करणारी; जर ती चहा चुकली तर अनेकांना चुकलं चुकल्यासारखं वाटतं. सकाळच्या कामाच्या गडबडीत आपली पहिली शांतता मिळते ती म्हणजे 'चहाच्या कपामध्ये'. चहाचा तो पहिला घोट घेतल्याशिवाय आपल्याला दिवसाची ऊर्जाच मिळत नाही, खरं ना?
advertisement
2/8
पण अनेककदा चहा संबंधीत अनेक प्रश्न, समज-गैरसमज लोकांमध्ये असतात. आज चहात 'आलं' टाकू की 'गवती चहा'? साहेबांना आल्याचा चहा आवडतो, तर सासूबाईंना गवती चहाचा सुवास हवा असतो. चवीसाठी तर आपण हे दोन्ही वापरतोच, पण आरोग्याच्या बाबतीत या दोनपैकी कोणाचं पारडं जड आहे? नेमका कोणता चहा आपल्याला दिवसभर फ्रेश ठेवेल? चला, आज चहाच्या उकळीसोबत या प्रश्नाचं उत्तरही शोधूया.
advertisement
3/8
1. आल्याचा चहा (Ginger Tea): थंडी आणि सर्दीसाठी रामबाण उपायआलं हे प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरातील हुकमी एक्का आहे. चहामध्ये जेव्हा आलं कुटून पडतं, तेव्हा त्याचा तो तिखटपणा आणि सुगंध मनाला उभारी देतो.
advertisement
4/8
फायदे: जर तुम्हाला सारखी सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल किंवा डोकं जड झालं असेल, तर आल्याचा चहा बेस्ट आहे. पचन नीट होत नसेल किंवा पोटात गॅस धरला असेल, तर आल्याचा चहा घेतल्यावर लगेच आराम मिळतो.घरगुती टीप: सकाळी उठल्यावर जर सांधेदुखी किंवा अंगदुखी जाणवत असेल, तर आलं टाकलेला चहा नक्की पिऊन बघा.
advertisement
5/8
2. गवती चहा (Lemongrass Tea): मानसिक शांततेचा खजिनागवती चहाचा तो लिंबासारखा येणारा मंद सुगंध... नुसत्या वासानेच अर्धा थकवा निघून जातो.
advertisement
6/8
फायदे: जर तुम्हाला कामाचा खूप ताण (Stress) असेल किंवा रात्री नीट झोप लागत नसेल, तर गवती चहा तुमच्यासाठी उत्तम आहे. हा चहा प्यायल्याने मन शांत होतं. शिवाय, ज्यांना त्वचेच्या समस्या आहेत किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी गवती चहा अँटी-ऑक्सिडंट्सचं काम करतो.घरगुती टीप: पोटातील जळजळ कमी करण्यासाठी आल्यापेक्षा गवती चहा जास्त गुणकारी ठरतो.
advertisement
7/8
दोन्हींपैकी चांगलं कोण?बघा सख्यांनो, हे दोन्ही औषधी आहेत. पण तुमची गरज काय आहे, त्यावर निवड करा:जर शारीरिक थकवा, सर्दी किंवा पचनशक्ती सुधारायची असेल, तर आल्याचा चहा निवडा.जर मानसिक ताण, चिडचिड किंवा फ्रेश वाटायचं असेल, तर गवती चहा कधीही उत्तम.
advertisement
8/8
एक छोटीशी चूक आपण नेहमी करतो...अनेकदा लोक चहा खूप वेळ उकळवतात. चहा जास्त उकळला की त्यातला कडवटपणा वाढतो आणि आलं किंवा गवती चहाचा जो औषधी अर्क असतो, तो नष्ट होतो. चहा गाळण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे हे पदार्थ टाका आणि गॅस बंद करून वाफेवर थोडा वेळ झाकून ठेवा. मग बघा चहाची चव कशी लागते ते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ginger Tea vs Lemongrass Tea : गवती की आल्याचा, आरोग्यासाठी कोणता चहा आहे 'नंबर 1'? फक्त चवच नाही तर 'या' गोष्टींही महत्वाच्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल