Teachers Day 2025 : गुरुर साक्षात् परब्रह्म... शिक्षक दिनानिमित्त शेअर करा हे खास शुभेच्छा संदेश
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Teachers Day Wishes In Marathi : भारतात शिक्षक दिन दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे एक महान शिक्षक, विद्वान आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांनी आपले जीवन शिक्षण क्षेत्राला समर्पित केले. त्यांचा जन्मदिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करतात आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. पालकांनंतर शिक्षक हा मुलाच्या आयुष्यातील सर्वात मोठा मार्गदर्शक असतो. शिक्षकच विद्यार्थ्यानाै घडवण्याचे आणि त्यांच्या जीवनात शिस्त, संस्कार आणि आदर्शांची बीजे रोवतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एखाद्या महान शिक्षकाचा हात असतो. या शिक्षक दिनानिमित्त तुम्ही येथे दिलेले संदेश स्टेटसला ठेवू शकता किंवा तुमच्या शिक्षकांना पाठवून मनापासून आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करू शकता.
advertisement
1/9

एक चांगला शिक्षक जीवनात आशा देतो आणि आम्हाला प्रेरणा देतो. आम्हाला नेहमीच पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/9
"गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा । गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/9
आपल्या ज्ञानदीपामुळे आमच्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली. तुमच्या मार्गदर्शनाबद्दल सदैव ऋणी राहू. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/9
शिक्षक म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकातील धडे शिकवणारा नसतो, तर आयुष्यभरासाठी मार्ग दाखवणारा दीपस्तंभ असतो. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/9
शिक्षक हीच खरी शिल्पकाराची भूमिका निभावतात. विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणाऱ्या या शिल्पकारांना सलाम... शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/9
विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी स्वतःला झिजवणाऱ्या सर्व गुरूंना मानाचा मुजरा. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/9
गुरु आहे जीवनाचा प्रकाश, तुमच्या आशीर्वादात वाढतो विश्वास। शिक्षक दिनी मनापासून, तुम्हाला देऊ प्रेमाचा साज। शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
8/9
शिक्षकांचे आपल्या आयुष्यात सर्वोच्च स्थान असते, जर ते आपल्यासोबत असतील तर प्रत्येक मार्ग सोपा होतो. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
9/9
तुम्ही ज्ञानाचा दिवा लावला, तुम्ही आम्हाला अंधारातून प्रकाशात आणले. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Teachers Day 2025 : गुरुर साक्षात् परब्रह्म... शिक्षक दिनानिमित्त शेअर करा हे खास शुभेच्छा संदेश