दिवाळीत फराळ झाला मस्त पण वजन वाढलं जास्त, कमी करण्यासाठी हे करा फस्त!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
दिवाळीचा फराळ खाल्ल्यानंतर वजन वाढण्याची शक्यता असते म्हणून आहार तज्ज्ञांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
advertisement
1/7

सध्या दिवाळी सुरू आहे. दिवाळी म्हटलं की सर्वांच्या घरीगोड पदार्थ तयार होतात. या फराळावरती छान ताव मारला जातो. मात्र, दिवाळीचा फराळ खाल्ल्यानंतर वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणून हे वजन वाढू नये म्हणून तुमचा आहार कसा असावा याबद्दलच <a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/">छत्रपती संभाजीनगरमधील</a> आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
advertisement
2/7
या काळामध्ये तुम्ही सर्वांनी फायबर असणारे जे घटक आहेत किंवा जे पदार्थ आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये खा. अन्न पचण्यासाठी जे बॅक्टेरियल म्हणजे प्रोबायोटिक्स म्हणजेच दह्याचा वापर जास्त करायचा आहे. दह्याचा वापर केल्यामुळे पदार्थ लवकर पचन व्हायला मदत होते.
advertisement
3/7
तुमच्या आहारामध्ये दह्याचा भरपूर समावेश हा करावा. ज्यांना असं वाटतंय आपल्या वजन वाढते तर दुपारच्या जेवणामध्ये तीन-चार गवारीच्या शेंगा खाल्ल्या तर जेवण लवकर पचायला मदत होते, असं अलका कर्णिक सांगतात.
advertisement
4/7
कच्चा कांदा देखील खाल्ल्यामुळे सुद्धा अन्न पचायला मदत होते. आपण जेव्हा साऊथ इंडियन किंवा हेवी जेवण केलं तर कांदा खाल्ल्यामुळे ते डायजेस्ट व्हायला मदत होते. तुमच्या आहारामध्ये एक आख्या टोमॅटो साली सगट खाल्ला तर शरीरामधील चरबी कमी व्हायला आणि रक्त पातळ करायला टोमॅटो हा मदत करतो.
advertisement
5/7
तसंच कच्ची भेंडी देखील खावी. भेंडीमध्ये भरपूर असं फॉस्फरस आणि खनिजे हे असतात. जेवढे तुम्ही सकाळी तेजस्वी आणि टवटवीत असतात तेवढेच संपूर्ण दिवसभर तुम्ही तेजस्वी आणि टवटवीत असतात. त्यामुळे दररोज दोन ते तीन कवळ्या भेंड्या या तुमच्या आहारामध्ये असाव्यात, असंही अलका कर्णिक यांनी सांगितले.
advertisement
6/7
या सोबत फळ देखील तुम्ही खाऊ शकता. यांनी सुद्धा तुम्हाला वजन कमी करायला मदत होते. त्यासोबत जास्त गोड फळं खाण्यापेक्षा थोडीशी आंबट फळे खाल्लेले चांगलं असतं.
advertisement
7/7
आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मेथीचे दाणे असतात. दहा-बरा दाणे हे गोळी सारखे पाण्यासोबत गिळून घ्यायचे आहेत. यांनी सुद्धा वजन कमी व्हायला मदत होते. तसंच जेवण झाल्यानंतर जवस जर खाल्ला तर यांनी सुद्धा वजन कमी व्हायला मदत होते, अशी माहिती अलका कर्णिक यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
दिवाळीत फराळ झाला मस्त पण वजन वाढलं जास्त, कमी करण्यासाठी हे करा फस्त!