TRENDING:

बदाम खाल्ल्याने खरंच स्मरणशक्ती वाढते? दररोज नेमके किती बदाम खावे?

Last Updated:
आहारतज्ज्ञ दीपंकर घोष यांनी सांगितलं की, व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियममुळे स्मरणशक्ती कमालीची वाढते. त्यासाठी बदाम अत्यंत फायदेशीर ठरतात, परंतु भिजवलेले. (सुष्मिता गोस्वामी, प्रतिनिधी / कोलकाता)
advertisement
1/5
बदाम खाल्ल्याने खरंच स्मरणशक्ती वाढते? दररोज नेमके किती बदाम खावे?
बदामामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं. सारखी भूक लागत नाही. परिणामी वारंवार खाणंपिणं होत नाही. त्यामुळे शरिरात अतिरिक्त चरबी जमा न झाल्यानं वजनही नियंत्रणात राहतं.
advertisement
2/5
बदामात अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ज्याचा फायदा त्वचेलाही होतो. त्वचेच्या आतली घाण बाहेर पडते आणि त्वचा छान तुकतुकीत दिसते. शिवाय त्वचेवर जळजळ होत असेल, खाज येत असेल तर तीसुद्धा बरी होते आणि त्वचेतला ओलावा टिकून राहतो.
advertisement
3/5
स्मरणशक्ती चांगली व्हावी म्हणून केवळ लहान मुलांनीच नाही, तर जास्त ताणाचं काम करणाऱ्या सर्वांनी दररोज दोन बदाम खावे, त्यामुळे मेंदू सुपीक राहतं.
advertisement
4/5
केसांच्या वाढीपासून केस गळण्याची समस्या रोखण्यापर्यंत आणि त्वचेला चमक देण्यापर्यंत बदाम फायदेशीर असतात. त्यामुळे बदाम खाल्ल्यानं <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/expert-tips-for-healthy-teeth-mhij-1198597.html">आरोग्य</a> <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/start-your-day-with-ayurvedic-tea-it-is-helpful-for-mental-health-l18w-mhij-1198578.html">निरोगी</a> राहतं.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित असली तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/surprising-health-benefits-of-bhindi-l18w-mhij-1198769.html">आहारासंबंधित</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
बदाम खाल्ल्याने खरंच स्मरणशक्ती वाढते? दररोज नेमके किती बदाम खावे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल