पावसाळ्यात चुकूनही या भाज्या खाऊ नका, अन्यथा बसू शकतो मोठा फटका, डॉक्टरांनी केलं सावधान..
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
Vegetables to avoid during monsoon : पावसाळा सुरू झाला म्हणजे खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यात काही भाज्यांबाबत धोका वाढतो. त्यामुळे विविध आजार तसेच फूड प्वॉयझनिंगकी समस्या होऊ शकते. अशावेळी तुम्हाला रुग्णालयातही दाखल व्हावे लागू शकते. म्हमून नेमकी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेऊयात. (रुपांशू चौधरी, प्रतिनिधी)
advertisement
1/5

मान्सून महिन्याचे आगमन झाले आहे. अशावेळी मान्सूनच्या महिन्यात मिळणाऱ्या भाज्यांमुळे आजारांचा धोका वाढतो. म्हणून अशा भाज्या खाण्यापूर्वी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत झारखंडच्या हजारीबाग येथील सदर रुग्णालयाच्या आयुष विभागाचे डॉ. मकरंद कुमार मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
2/5
डॉ. मकरंद कुमार मिश्रा यांनी राजकीय आयुर्वेदिक कॉलेज बेगूसराय बिहार येथून BAMS चे शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांना 24 वर्षांचा वैद्यकीय क्षेत्राचा अनुभव आहे. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पावसाळ्यात उपलब्ध भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे कीटक, जिवाणू इत्यादी वाढतात. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका सर्वाधिक असतो.
advertisement
3/5
ते पुढे म्हणाले की, पत्ताकोबी, फूलकोबी आणि ब्रोकली या भाज्या खाऊ नयेत. या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्द्रता आढळून येते. म्हणून त्यामध्ये अनेक प्रकारची बुरशीनाशके तयार होतात.
advertisement
4/5
तसेच हिरव्या पालेभाज्या आणि पत्ता कोबी सारख्या भाज्यांचे कमी सेवन करायला हवे. या भाज्या चांगल्याप्रकारे धुवून घ्याव्यात. तसेच त्यांना उकळून खावे. उन्हाळ्यात वांग्यांमध्येही सर्वाधिक कीटक आढळतात त्यामुळे वांग्याचे सेवन करण्यापूर्वी ते पूर्णपणे स्वच्छ करावे.
advertisement
5/5
डॉ. मकरंद बताते यांनी पुढे सांगितले की, ज्या भाज्या जमिनीखाली उगतात, त्यांचे सेवनही टाळायला हवे. जसे की, मूळा, गाजर, बीट, सलगम. पावसाळ्यात या भाज्या अधिक ओलसर होतात आणि अनेक कीटक आणि बुरशी त्यामध्ये राहू लागतात. या सर्वांव्यतिरिक्त, जंगली मशरूम देखील अत्यंत सावधगिरीने खावे लागतात, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
पावसाळ्यात चुकूनही या भाज्या खाऊ नका, अन्यथा बसू शकतो मोठा फटका, डॉक्टरांनी केलं सावधान..