Heath Tips: सकाळचा चहा सोडा, हे 5 बेस्ट हेल्दी पर्याय ट्राय करा, वजन वाढ, शुगरचं टेन्शनच नाही!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Health Tips: रोज सकाळचा चहा अनेकांच्या सवयीचा भाग असतो. त्यामुळे सकाळच्या चहाला पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी 5 बेस्ट पेयं आहेत.
advertisement
1/7

दररोज सकाळी उठल्यावर गरमागरम चहा पिण्याची सवय बहुतेक घरांमध्ये आढळते. मात्र तज्ज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी चहा पिण्याऐवजी काही नैसर्गिक आणि पोषक पेये घेतल्यास शरीर अधिक सुदृढ राहते आणि अनेक आरोग्यविषयक त्रास टाळता येतात. आहारतज्ज्ञांच्या मते, पुढील 5 पेये सकाळी चहा ऐवजी घेतल्यास अनेक फायदे होऊ शकतात.
advertisement
2/7
कोमट पाण्यात लिंबू आणि मध: कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिक्स करून प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं. मेटाबॉलिझम सुधारतो आणि वजन कमी करण्यास मदत होते.
advertisement
3/7
हळद दूध: दुधात हळद मिसळून प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सांधेदुखी, सूज यावर आराम मिळतो आणि हा थंडी, खोकल्यावर प्रभावी उपाय आहे.
advertisement
4/7
आवळा रस: आवळा रस सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. केस आणि त्वचेसाठी उत्तम आहे. अँटीऑक्सिडंट्सनी युक्त आहे.
advertisement
5/7
मेथी पाणी: सकाळी चहाच्या जागी मेथी पाणी प्यायल्याने डायजेशन सुधारते. ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि पोट फुगणे गॅस होणे या समस्या कमी होतात.
advertisement
6/7
ग्रीन टी / हर्बल टी: ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत. त्यामुळे मानसिक ताजेपणा मिळतो आणि वजन कमी करण्यास मदत होते.
advertisement
7/7
हे पेय सकाळी उठल्यावर, रिकाम्या पोटी घेतल्यास शरीराला चांगली ऊर्जा मिळते आणि पचनसंस्थेपासून ते त्वचेपर्यंत संपूर्ण आरोग्य सुधारते. डायटिशियन सांगतात, “सकाळच्या चहा ऐवजी नैसर्गिक पेय प्यायल्यास दीर्घकालीन आरोग्यदायी जीवनशैली साध्य होते.”
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Heath Tips: सकाळचा चहा सोडा, हे 5 बेस्ट हेल्दी पर्याय ट्राय करा, वजन वाढ, शुगरचं टेन्शनच नाही!