TRENDING:

डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी तुम्हीही कारलं खाताय? ही चूक कधीही करू नका

Last Updated:
मधुमेहाचा त्रास असणारे अनेकजण कडू कारले खाण्याला प्राधान्य देतात. परंतु, कारले खाताना चूक केल्यास धोका वाढू शकतो.
advertisement
1/9
डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी तुम्हीही कारलं खाताय? ही चूक कधीही करू नका
सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहासारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्या हेच मधुमेहाचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते.
advertisement
2/9
रक्तातील साखरेचं वाढतं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत सावध राहतात. बऱ्याचदा साखर नियंत्रणासाठी आहारात कडू भाजी म्हणून कारल्याचा समावेश केला जातो. पण, कारले खाताना अशा चुका केल्या जातात की त्यामुळे साखर कमी होण्याऐवजी वाढते.
advertisement
3/9
अनेक आहारतज्ञ आणि डॉक्टर असेही सांगतात की मधुमेहामध्ये कारले खाल्ल्याने ग्लायसेमिक नियंत्रण राहते. कारले रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
advertisement
4/9
कारल्यामध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स कमी असल्याने ते वजन कमी करण्यासोबतच मधुमेहावरही गुणकारी आहे. तथापि, कारले जास्त प्रमाणात किंवा योग्य प्रकारे न खाणे प्रतिकूल असू शकते.
advertisement
5/9
तुम्ही कोणतीही भाजी कच्ची खात असाल तर त्याचा परिणाम वेगळा असेल. जर तुम्ही ते शिजवल्यानंतर खात असाल तर त्याचा परिणाम वेगळा असेल. कारण बर्‍याच गोष्टी भाजी कशा प्रकारे शिजवल्या जातात यावर देखील अवलंबून असतात, असे दिल्लीचे सुप्रसिद्ध एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. संजय कालरा सांगतात.
advertisement
6/9
त्यामुळे तुम्ही कारले खात असलात तरी जर ते शिजवण्याची आणि खाण्याची पद्धत बरोबर नसेल तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. ज्या भाज्या आपण तेलात किंवा तुपात तळून किंवा तळल्यानंतर खातो, त्यात साखरेमध्ये खूप गडबड होते. जर तुम्ही पारंपारिक पध्दतीने कारले तळलात तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल.
advertisement
7/9
जर तुम्हाला कच्च्या कारल्याचा रस प्यायला आवडत नसेल आणि त्याची भाजी खायची इच्छा असेल, तर कारले तेलात तळण्याऐवजी उकळवा. पारंपारिक पद्धतीने कापून कुकरमध्ये ठेवा, दोन शिट्ट्या द्या आणि नंतर भरलेले कारले बनवा. यासाठी तेल कमी लागेल आणि कारले खाणे फायद्याचे ठरेल.
advertisement
8/9
कारल्याचे लहान तुकडे करा, लिंबूने मॅरीनेट करा आणि त्याची सॅलड खा किंवा सूप प्या. मधुमेह असेल तर कारल्याचा रस पिऊ शकतो, असे डॉक्टर सांगतात.
advertisement
9/9
कारल्याचे तेलात फ्राय केलेले चिप्स, फ्राइड कारले आणि जास्त तेलात बनवलेली कारल्याची भाजी खाऊ नये, असा सल्ला डॉक्टर देतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी तुम्हीही कारलं खाताय? ही चूक कधीही करू नका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल