TRENDING:

Health Tips: अपुरी झोप अन् सततचा ताण, मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतोय परिणाम, हे करा घरगुती उपाय

Last Updated:
मेंदूचे कार्य सुरळीत सुरू नसेल तर आपल्या एकूण मानसिक क्षमतेवर आणि आरोग्याव परिणाम होतो.
advertisement
1/7
अपुरी झोप अन् सततचा ताण,मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतोय परिणाम,हे करा घरगुती उपाय
मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. त्याच्या कार्यातील किंचितसा बिघाड देखील त्रासदायक ठरतो. मेंदूचे कार्य सुरळीत सुरू नसेल तर आपल्या एकूण मानसिक क्षमतेवर आणि आरोग्याव परिणाम होतो.
advertisement
2/7
सततचा तणाव, अपुरी झोप आणि अयोग्य आहार यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते. मात्र, काही घरगुती नैसर्गिक उपायांमुळे आपण मेंदू तंदुरुस्त ठेवू शकतो. याबाबत लोकल 18ने बीड जिल्ह्यातील डॉक्टर झांजुर्णे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली.
advertisement
3/7
मेंदूचे आरोग्य चांगले राहावे यासाठी, आपल्या दैनंदिन आहारामध्ये ड्रायफ्रुट्सचा समावेश केला पाहिजे. रात्री भिजवलेले चार ते पाच बदाम दररोज सकाळी खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढते.
advertisement
4/7
अक्रोडामध्ये मेंदूसाठी आवश्यक असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय, दररोज रात्री झोपण्यापूर्वी हळदी टाकून कोमट दूध प्यायल्यास मेंदूची सूज कमी होते. हळदीमधील 'करक्यूमिन' हा घटक मेंदूच्या पेशींना सशक्त बनवतो.
advertisement
5/7
मेंदूच्या आरोग्यासाठी लसूण देखील उपयुक्त आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या कच्च्या एक ते दोन पाकळ्या खाल्ल्यास शरीरात अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण वाढते. हा घटक आपल्या मेंदूला चिरतरुण ठेवण्यास मदत करतो. याशिवाय डाळिंब, जांभूळ, मोसंबी यांसारख्या फळांचे रस अँटीऑक्सिडंट्सयुक्त असतात. त्यातून मेंदूला ऊर्जा आणि ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो.
advertisement
6/7
डार्क चॉकलेटचा छोटा तुकडा खाल्ल्यास लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. यामध्ये फ्लाव्होनॉयड्स आणि नैसर्गिक कॅफिन असते, त्यामुळे मानसिक थकवा कमी होतो. याशिवाय हिरव्या पालेभाज्यांमध्ये (पालक, मेथी, ब्रोकली) भरपूर प्रमाणात फोलेट आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक मेंदूच्या पेशींचं संरक्षण करतात.
advertisement
7/7
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्राणायाम आणि ध्यानधारणा गरजेची आहे. दररोज 10 ते 15 मिनिटे ध्यान केल्याने तणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते. याशिवाय शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दररोज किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. हे सर्व उपाय घरच्या घरी सहज करता येतात. विशेष म्हणजे त्यांचा कोणताही साइड इफेक्ट होत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: अपुरी झोप अन् सततचा ताण, मेंदूच्या कार्यक्षमतेवर होतोय परिणाम, हे करा घरगुती उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल