TRENDING:

Watermelon: रंगाला भुलाल तर आरोग्याला मुकाल, कलिंगड खरेदीपूर्वी लक्षात ठेवा 5 टिप्स

Last Updated:
Watermelon: कलिंगड खरेदी करताना नैसगिर्करित्या पिकवलेलं कलिंगड ओळखण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहुयात. 
advertisement
1/9
रंगाला भुलाल तर आरोग्याला मुकाल, कलिंगड खरेदीपूर्वी लक्षात ठेवा 5 टिप्स
उन्हाळा सुरू झाला की लालभडक, रसाळ कलिंगड आवर्जून बाजारातून आणलं जातं. कलिंगड खायला सर्वांना आवडतं. ते अत्यंत आरोग्यदायी देखील आहे. परंतु, बऱ्याचदा कलिंगड खाल्ल्यावर आजारी पडल्याचेही प्रकार घडतात.
advertisement
2/9
बाजारात काही व्यापारी कलिंगडांना अधिक आकर्षक दिसण्यासाठी कृत्रिम रंग व रसायने वापरत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे गोडसर, ताजेतवाने वाटणारे फळ खरंच आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? याची तपासणी करणं गरजेचं आहे.
advertisement
3/9
कलिंगड खरेदी करताना नैसगिर्करित्या पिकवलेलं कलिंगड ओळखण्यासाठी काही सोप्या टिप्स आज आपण पाहुयात.
advertisement
4/9
फळाचा तळभाग तपासा – नैसर्गिक कलिंगडाचा तळभाग किंचित पिवळसर असतो. तर संपूर्ण एकसंध रंगाचे कलिंगड कृत्रिमरित्या पिकवलेले असण्याची शक्यता असते.
advertisement
5/9
पाण्यात टाका – कलिंगडाचा लहानसा तुकडा पाण्यात टाकल्यास पाणी गुलाबीसर होते का हे पाहा. पाणी रंगाळल्यास त्यावर कृत्रिम रंग लावलेला असतो.
advertisement
6/9
बियांचा रंग – नैसर्गिक कलिंगडाच्या बिया तपकिरी किंवा काळसर असतात, तर कृत्रिमरित्या रंगवलेल्या कलिंगडाच्या बिया पांढऱ्या रंगाच्या असतात.
advertisement
7/9
आतला रंग आणि स्पर्श – नैसर्गिक कलिंगडाचे गर लालसर पण नैसर्गिक दिसते, तर रासायनिक कलिंगड अतिशय गडद लालसर असते आणि कधी कधी रंग हातालाही लागतो.
advertisement
8/9
आरोग्य धोका – रसायनयुक्त कलिंगड खाल्ल्याने अन्नविषबाधा, पचनसंस्थेच्या तक्रारी आणि गंभीर आरोग्यविषयक धोके संभवतात.
advertisement
9/9
सजग राहा, स्वास्थ्य जपा – कलिंगड खरेदी करताना आकर्षक रंगाला भुलू नका, योग्य तपासणी करूनच नैसर्गिक व सुरक्षित फळांची निवड करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Watermelon: रंगाला भुलाल तर आरोग्याला मुकाल, कलिंगड खरेदीपूर्वी लक्षात ठेवा 5 टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल