उन्हात घराबाहेर पडावसंच वाटत नाही, मग घरात व्हिटॅमिन D कसं मिळवावं? उत्तर एकदम सोपं
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपली हाडं भक्कम राहावी यासाठी व्हिटॅमिन D अत्यंत आवश्यक असतं. जे सूर्यप्रकाशातून मिळतं. म्हणूनच लहान मुलांना कोवळं ऊन दिलं जातं. शिवाय लहानपणापासून भरपूर ऊन घ्यावं असं डॉक्टर सांगतात. परंतु मे महिन्यात एवढं कडाक्याचं ऊन पडतं की, घराबाहेर पडावसंच वाटत नाही. अशावेळी घरच्या घरी व्हिटॅमिन D कसं मिळवावं याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.
advertisement
1/5

डॉक्टर टीना यांनी सांगितलं की, उन्हाळ्यात सफरचंद भरपूर खावे. त्यामुळे शरिरातली व्हिटॅमिन D सह व्हिटॅमिन A आणि Cची कमतरता भरून निघते. शिवाय हाडंसुद्धा भक्कम होतात.
advertisement
2/5
उन्हाळ्यात तुमच्या आहारात दूध आणि दही असायलाच हवं, ज्यामुळे पोट थंड राहतं, हाडं भक्कम होतात आणि शरिरातली व्हिटॅमिन Dची कमतरता दूर होते.
advertisement
3/5
उन्हाळ्यात अननस हे फळसुद्धा आरोग्यासाठी उत्तम असतं. त्यात भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि कॅल्शियम असतं, जे हाडांसाठी उपयुक्त ठरतं.
advertisement
4/5
डॉक्टरांनी सांगितलं की, उन्हाळ्यात स्ट्रॉबेरीसुद्धा भरपूर खावी. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन D, कॅल्शियम आणि पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं. ज्यामुळे हाडं कमालीची भक्कम होतात.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. परंतु आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हात घराबाहेर पडावसंच वाटत नाही, मग घरात व्हिटॅमिन D कसं मिळवावं? उत्तर एकदम सोपं