Health tips : हिवाळ्यात मुळा खाण्याचे आहेत खूपच फायदे, डॉक्टरांनी काय काय सांगितलं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
radish benefits - हिवाळ्यात मुळा खाणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. यामुळे सर्दी, खोकला आणि इतर समस्यांवर नक्कीच आराम मिळू शकते. आयुर्वेदिक डॉ. मनीष शर्मा यांनी याबात माहिती दिली. जाणून घेऊयात, हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदे. (राहुल मनोहर/सीकर, प्रतिनिधी)
advertisement
1/7

आयुर्वेदिक डॉ. मनीष शर्मा यांनी सांगितले की, कोशिंबीर, पराठा, लोणची, भाजी किंवा सूप बनवण्यासाठी मुळा वापरला जातो. मुळा खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फॉस्फरस आणि इतर महत्त्वाचे घटक असतात. मुळ्यात फायबर असल्याने बद्धकोष्ठता आणि पोटाच्या इतर समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते.
advertisement
2/7
मुळा हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. यामुळे यकृत आणि मूत्रपिंड स्वच्छ होते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात. काविळीमध्ये मुळ्याचे सेवन फायदेशीर मानले जाते.
advertisement
3/7
मुळा खाल्ल्याने पोट भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
advertisement
4/7
मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करण्यास मदत होते.
advertisement
5/7
मुळ्यामध्ये पोटॅशियम असते. ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
advertisement
6/7
मुळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यात इन्सुलिन स्राव सुधारणारी घटकही असतात.
advertisement
7/7
मुळ्यात अँटिऑक्सिडंट्स आणि पाण्याने समृद्ध असल्याने त्वचा हायड्रेट राहते. तसेच ती स्वच्छ आणि चमकते. मुरुम आणि इतर त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी मुळा खाणे फायदेशीर आहे. (सूचना : या बातमीत दिलेली माहिती ही तज्ञांशी झालेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच फॉलो करावी. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health tips : हिवाळ्यात मुळा खाण्याचे आहेत खूपच फायदे, डॉक्टरांनी काय काय सांगितलं?