कधीपर्यंत सोसणार मूतखड्याचा त्रास? तुमच्या किचनमध्येच आहे रामबाण उपाय!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
लिंबू जेवढा आंबट तेवढा आरोग्यासाठी फायदेशीर! म्हणूनच आपण विविध पदार्थांमध्ये लिंबाचा रस वापरतो. परंतु लिंबाचे असे काही फायदे आहेत जे कदाचित तुम्हाला माहित नसतील. (आशीष त्यागी, प्रतिनिधी)
advertisement
1/6

आयुर्वेदिक डॉक्टर सुनीता सोनल धामा सांगतात की, लिंबू हे असं फळ आहे जे बारमाही सहज मिळतं. विशेष म्हणजे लिंबू व्हिटॅमिन सीने परिपूर्ण असतं आणि त्यामुळे अन्नपचन सुरळीत होतं.
advertisement
2/6
लिंबामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. शिवाय व्हिटॅमिन सीसुद्धा असल्यामुळे पोटाच्या सर्व समस्या दूर होऊन शरीर ऊर्जावान होतं. दररोज लिंबाचं सेवन केल्यास त्वचेवर तेज येतं.
advertisement
3/6
लिंबाचे शरिरावर काहीच साइड इफेक्ट्स होत नाहीत. म्हणूनच लिंबू आरोग्यासाठी जणू अमृतासमान मानलं जातं. मूडखड्याच्या त्रासावर लिंबामुळे आराम मिळू शकतो.
advertisement
4/6
लिंबामुळे शरिरातील टाकाऊ पदार्थ सहज बाहेर पडतात आणि आजारपणापासून <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/home-remedies-to-keep-your-stomach-safe-from-infections-in-rainy-season-l18w-mhij-1217626.html">आरोग्याचं रक्षण</a> होतं. नियमितपणे लिंबाचं सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहू शकतं आणि त्वचा तजेलदार होऊ शकते.
advertisement
5/6
लिंबाच्या नियमित सेवनामुळे शरीर डिटॉक्स होतं. आपण <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/healthy-diet-for-monsoon-stay-fit-mhij-1217865.html">स्वयंपाकात</a> लिंबाचा वापर करू शकता किंवा लिंबू पिळलेलं पाणी पिऊ शकता. शिवाय लिंबाचं लोणचं खाणंही उत्तम, असं डॉक्टरांनी सांगितलं.
advertisement
6/6
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/bitter-melon-has-benefits-for-diabetes-and-liver-mhij-1217995.html">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
कधीपर्यंत सोसणार मूतखड्याचा त्रास? तुमच्या किचनमध्येच आहे रामबाण उपाय!