Summer Tips: कलिंगड फ्रिजमध्ये ठेऊन खाताय? उन्हाळ्यात अजिबात करू नका ही चूक, आरोग्याला धोका!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Summer Health: उन्हाळ्यात अनेकजण फ्रिजमध्ये ठेवलेली फळे खातात. पण हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
1/5

उन्हाळा सुरू झाला की थंड खाण्याकडे सर्वांचा कल असतो. अनेकजण कलिंगड सारखी फळे घरात फ्रिजमध्ये ठेवून देखील खातात. चौका चौकात सरबत, मठ्ठा आदी पेयांचे स्टॉल लागलेले असतात. त्यासोबतच फ्रुट स्टॉल देखील पाहायला मिळतात.
advertisement
2/5

या फळांच्या स्टॉलवर बऱ्याचदा फळे थंड होण्यासाठी बर्फाच्या लादिवर कापून ठेवलेली असतात. अशा स्टॉलवर मिळणाऱ्या थंड फळांचा किंवा घरातही फ्रिजमध्ये थंड केलेल्या फळांचा आस्वाद घेणं बऱ्याचदा शरीरासाठी घातक देखील ठरू शकतं. याबाबत कोल्हापुरातील आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी माहिती दिलीये.
advertisement
3/5
खरंतर थंड फळांमुळे शरीराला मिळणारा थंडावा हा तात्पुरत्या स्वरुपाचा असतो. मात्र त्यानंतर आपल्या शरीरामध्ये पोटाशी संबंधित समस्या किंवा घशामध्ये त्रास होऊ लागतो. सर्दी, खोकला यासारख्या बऱ्याच समस्या या थंड फळांमुळे होऊ शकतात, असं सूर्यवंशी सांगतात.
advertisement
4/5
फळे थंड केल्याने त्यांच्यातील अँटिऑक्सिडंट्स खराब होऊ शकतात. त्यामुळे फ्रीजमधून एक तास किंवा अर्धातास आधी काढून ती बाहेर काढून ठेवावीत. फळांचे तापमान अतिथंड न राहता साधारण सामान्य करून मग त्या फळांचे सेवन करावे. ताजी फळे फ्रीजमध्ये न ठेवता तशाच पद्धतीने खाल्लीत तर ती शरीरासाठी अधिक चांगली ठरतात.
advertisement
5/5
फळांचा गुणधर्मच मुळात थंडावा देण्याचा आहे. त्यामुळे थंड न करता खालील फळे देखील शरीराला थंडावा देतात. त्यामुळेच कोणतीही फळे फ्रिजमध्ये न ठेवता सामान्य तापमानाला असतानाच चिरून खावीत. ती शरीरासाठी जास्त फायदेशीर असतात, असेही सूर्यवंशी सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Tips: कलिंगड फ्रिजमध्ये ठेऊन खाताय? उन्हाळ्यात अजिबात करू नका ही चूक, आरोग्याला धोका!