PHOTOS : वर्षातून एकदाच मिळतं हे फळ, अनेक आजारांवर आहे उपयुक्त, जाणून घ्या फायदे
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
बाजारात अनेक प्रकारचे फळ मिळतात. फळ खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र, काही फळ हे असे असतात, जे वर्षातून फक्त काही दिवसच उपलब्ध असतात. यामुळे या फळांना खूप मागणी असते. ही फळे खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदा होतो. आज अशाच एका फळाबाबत जाणून घेऊयात.
advertisement
1/5

हे फळ तुम्हाला रस्त्याच्या बाजूला मिळून जाईल. ताडच्या झाडावर येणाऱ्या या फळाला तारकुन असे म्हणतात. हे फळ चविष्ट असते. तसेच याचे अनेक फायदेही आहेत.
advertisement
2/5
हे फळ गोड असते. सोबतच याची चवही अप्रतिम असते. या फळामध्ये पाणी भरलेले असते. हे पाणी पिताना थंड लागते. आरोग्याच्या दृष्टीने हे फळ खूप चांगले आहे. उत्तरप्रदेश-बिहारसारख्या ठिकाणी हे फळ मोठ्या प्रमाणात मिळते.
advertisement
3/5
लोकल 18 ने पूर्णियामध्ये या फळाची विक्री करणाऱ्या दुकानदार मोहम्मद मुद्दी यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उन्हाळ्यात या फळाला खूप मागणी असते. पूर्णियाच्या राजकीय मेडिकल कॉलेजचे प्रिवेंशन सोशल मेडिसिनचे डॉ. अभय कुमार यांनी सांगितले की, ताडच्या फळाने हे फळ मिळते.
advertisement
4/5
जागेनुसार, या फळाचे नावही बदलते. मात्र, बिहारमध्ये या फळाला तारकुन या नावाने ओळखले जाते. हे फळ वर्षातून एकदाच मिळते. वरुन हे फळ कठोर असते.
advertisement
5/5
मात्र, त्याला सोलल्यावर आत हे नरम असते. या फळामध्ये पाणी भरलेले असते. खायलाही हे फळ स्वादिष्ट लागते. अभय कुमारने सांगितले की, हे फळ खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठताची समस्या येत नाही. यामध्ये बरेच जीवनसत्त्वे आढळतात. त्यामुळे कर्करोगाच्या तसेच हृदयाच्या आजारांनाही प्रतिबंधित करते, असे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
PHOTOS : वर्षातून एकदाच मिळतं हे फळ, अनेक आजारांवर आहे उपयुक्त, जाणून घ्या फायदे