Thyroid Control Tips: थायरॉइडचा त्रास असेल तर हे पदार्थ चुकूनही खाऊ नका!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आजकाल अनेकजणांना थायरॉइडच्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यावर मात करण्यासाठी डॉक्टरांनी दिलेलं औषध योग्य वेळी घ्यावंच, परंतु आहाराबाबत काही पथ्य पाळणंही आवश्यक आहे.
advertisement
1/5

कळत-नकळतपणे आपल्या जेवणात असे अनेक पदार्थ येतात, ज्यामुळे थायरॉइडचा त्रास वाढू शकतो. म्हणूनच थायरॉइडच्या त्रासात नेमके कोणते पदार्थ खायचे नाहीत, याची आपल्याला अचूक माहिती असायला हवी.
advertisement
2/5
थायरॉइडच्या त्रासावर मात करण्यासाठी वेळच्या वेळी औषध घेणं आवश्यक असतंच, शिवाय जीवनशैलीत काही बदल करणंही अत्यंत महत्त्वाचं आहे. खाण्याबाबत केलेली एक चूकही आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
advertisement
3/5
डॉ. बिस्वजित सरकार सांगतात की, सोयाबीन किंवा सोया पदार्थ खाल्ल्यास थायरॉइडची समस्या वाढते. शिवाय फ्लॉव्हरची भाजी खाऊ नये. तसंच कॉफी तर अजिबात पिऊ नये.
advertisement
4/5
थायरॉइडमध्ये दूध, दही, चीज आणि बटर <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/mango-seeds-are-very-beneficial-read-about-their-amazing-benefits-l18w-mhij-1175162.html">खाणं</a> टाळावं. हे पदार्थ हॉर्मोनल असंतुलनास कारणीभूत ठरू शकतात. त्यांचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास ज्यांना नसेल त्यांनाही अचानक थायरॉइडचा त्रास होऊ शकतो.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण यापैकी कोणताही <a href="https://news18marathi.com/lifestyle/miracle-hand-got-separated-from-body-doctor-joined-it-back-mhij-1175113.html">उपाय</a> करण्यापूर्वी स्वत: <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/does-the-corona-vaccine-really-cause-blood-clots-mhij-1175262.html">तज्ज्ञांशी चर्चा</a> करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Thyroid Control Tips: थायरॉइडचा त्रास असेल तर हे पदार्थ चुकूनही खाऊ नका!