Health Tips: डोळ्याचे आरोग्य राहील चांगले, बदाम दूध पिण्याचे हे फायदे माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसंच बदामाचं दूध देखील खूप फायदेशीर ठरतं.
advertisement
1/5

बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसंच बदामाचं दूध देखील खूप फायदेशीर ठरतं. त्यामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक आपल्याला भेटत असतं. बदामाच्या दुधाचे नेमके काय फायदे आहेत किंवा त्यामधून कुठले घटक आपल्याला शरीराला मिळतात याविषयीची माहिती आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितली आहे.
advertisement
2/5
ज्या लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्सचा त्रास आहे, अशा लोकांसाठी हे बदामाचे दूध खूप फायदेशीर आहे. बदामाच्या दुधामध्ये विशेष करून कॅलरीज कमी असतात. गाईच्या दुधापेक्षा 70 ते 80% ने या कॅलरीज कमी असतात.
advertisement
3/5
त्यासोबतच कार्बोहायड्रेटचं प्रमाण देखील यामध्ये कमी असतं. काही जे ब्रँड असतात ते याला फोर्टीफाईड ज्यामुळे यामध्ये कॅल्शियम विटामिन डी ई ए ते हाडे मजबूत करण्यासाठी मदत करतात. पण या अलमंड मिल्क मध्ये प्रथिने कमी असतात. त्यासोबतच यामध्ये विटामिन ई आहे आणि ते अँटिऑक्सिड भरपूर प्रमाणात देते.
advertisement
4/5
या दुधामुळे आपल्याला हृदयविकार आणि शुगर साठी फायदेशीर राहू शकतात. तसंच यामध्ये कोलेस्ट्रॉल देखील कमी असतात. तसंच यामुळे जे एल डी एल असतात ते कमी करून एचडीएल वाढवण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच यामुळे डोळ्याचे आरोग्य देखील सुधारायला मदत होते.
advertisement
5/5
आशे याचे भरपूर प्रमाणात फायदे होतात. जर तुम्हाला घरी हे बदामाचे दूध तयार करायचं असेल तर त्याकरता तुम्ही रात्रभर बदाम भिजत घालायचं आणि सकाळी त्या बदामाचे वरचे कव्हर काढून त्यामध्ये थोडसं पाणी घालून हे एकजीव करून घ्यायचं आणि ते काढल्यानंतर तुमचं फ्रेश असं हे मिल्क तयार होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: डोळ्याचे आरोग्य राहील चांगले, बदाम दूध पिण्याचे हे फायदे माहितीये का?