TRENDING:

Health Tips: सकाळी 1 ग्लास गरम पाणी प्याल तर शरीराला अनेक फायदे, पण पिण्याची योग्य पद्धत माहितीये का?

Last Updated:
गरम पाणी प्यायल्यामुळे अनेक असे आजार कमी होतात आणि त्याचे भरपूर असे फायदे आपल्या शरीराला मिळतात. आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पितात.
advertisement
1/7
गरम पाणी प्याल तर शरीराला अनेक फायदे, पण पिण्याची योग्य पद्धत माहितीये का?
असं म्हणतात की गरम पाणी प्यायल्यामुळे अनेक असे आजार कमी होतात आणि त्याचे भरपूर असे फायदे आपल्या शरीराला मिळतात. आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पितात.
advertisement
2/7
पण आपण हे गरम पाणी पिताना काय काळजी घेतली पाहिजे किंवा हे पाणी आपण नुसते गरम करून प्यावे किंवा त्यामध्ये कुठला घटक घालून हे पाणी प्यायल्यानंतर जास्त फायदा होतो? याविषयीच माहिती आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी सांगितली आहे.
advertisement
3/7
सकाळी उठल्यानंतर आपण गरम किंवा कोमट पाणी घेऊ शकतो. जसं की आपण रात्री झोपल्यानंतर कुठलेही पाणी पीत नाही.त्यामुळे आपले शरीर मोठ्या प्रमाणात डीहायड्रेट होते.
advertisement
4/7
आपण जर सकाळी उठल्यानंतर गरम पाणी घेतले तर आपले शरीर हायड्रेट राहायला मदत होते. त्यासोबतच आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम देखील चांगली होते.
advertisement
5/7
तसंच यामुळे आपले लिव्हर डिटॉक्स व्हायला मदत होते आणि लिव्हरचे आरोग्य देखील चांगले राहते, असं आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे सांगतात.
advertisement
6/7
गरम पाणी प्यायल्यानंतर भरपूर असे फायदे आपल्या शरीराला मिळतात. गरम पाणी जर तुम्हाला घ्यायचे असेल तर हे गरम पाणी तुम्ही नुसते देखील घेऊ शकता किंवा त्यामध्ये तुम्ही इतरही कुठले घटक टाकून घेऊ शकता.
advertisement
7/7
जसं की तुम्ही त्यामध्ये दालचिनीची पावडर, जिरे पाणी, धने पाणी असे वेगवेगळे पाणी टाकून पिऊ शकता. तुमच्या प्रकृतीला जे चालते किंवा जे तुम्हाला सूट होते असे पाणी तुम्ही घेऊ शकता, असंही आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: सकाळी 1 ग्लास गरम पाणी प्याल तर शरीराला अनेक फायदे, पण पिण्याची योग्य पद्धत माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल