TRENDING:

फ्रिजमध्ये गव्हाच्या पिठाची कणिक ठेवणे आरोग्यासाठी घातक, वेळीच बंद करा ही सवय, नाहीतर होतील हे गंभीर परिणाम

Last Updated:
फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक आणि त्यापासून बनवलेल्या चपात्या खाण्याने पचनसंस्था आणि एकूणच शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
advertisement
1/7
फ्रिजमध्ये गव्हाच्या पिठाची कणिक ठेवणे आरोग्यासाठी घातक, वेळीच बंद करा ही सवय
गव्हाच्या पिठाची कणिक तयार करून ती फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय आजकाल अनेक घरांमध्ये दिसून येते. वेळेची बचत आणि सोयीस्करपणामुळे ही पद्धत लोकप्रिय झाली असली, तरी यामुळे आरोग्याला काही तोटे होऊ शकतात.
advertisement
2/7
फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक आणि त्यापासून बनवलेल्या चपात्या खाण्याने पचनसंस्था आणि एकूणच शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. फ्रिजमध्ये कणिक ठेवल्याने आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात? याविषयीचं आहार सल्लागार डॉ. अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
फ्रिजमध्ये कणिक ठेवल्याने त्यातील पोषक तत्वांचे प्रमाण कमी होते. गव्हाच्या पीठात असलेले प्रथिने आणि फायबर थंड तापमानात बदलतात, ज्यामुळे त्यांचे पचन कठीण होते. याचा परिणाम म्हणून पोट फुगणे, गॅस, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
4/7
तसेच, कणकेची चव आणि पोत यावरही परिणाम होतो, ज्यामुळे चपात्या कडक किंवा चिवट बनतात. हे पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण आणते.
advertisement
5/7
दुसरे महत्त्वाचे नुकसान म्हणजे बॅक्टेरियल दूषितता. फ्रिजमध्ये कणिक जरी थंड राहिली, तरी ती पूर्णपणे निर्जंतुक राहत नाही. कणकेची आर्द्रता आणि फ्रिजमधील वातावरण यामुळे सूक्ष्मजीव वाढण्याची शक्यता असते.
advertisement
6/7
अशा कणकेच्या चपात्या खाल्ल्याने पोटदुखी किंवा अन्नविषबाधा होऊ शकते. विशेषतः, कणिक जर 24 तासांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवली असेल, तर ही जोखीम वाढते.
advertisement
7/7
फ्रिजमधील कणकेचे स्टार्च रेट्रो ग्रेडेशनमुळे बदलते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढण्याची शक्यता असते, जे मधुमेहींसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे ताजी कणिक आणि चपात्या हाच आरोग्यासाठी उत्तम पर्याय असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
फ्रिजमध्ये गव्हाच्या पिठाची कणिक ठेवणे आरोग्यासाठी घातक, वेळीच बंद करा ही सवय, नाहीतर होतील हे गंभीर परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल