TRENDING:

Reel पाहण्याची नशा फार वाईट, हे वाचून तुम्हाला बसेल शॉक!

Last Updated:
विशेषता सतत मोबाईलवर रिल्स, स्क्रोलिंग आणि व्हिडीओ पाहण्यामुळे मेंदूवर डिजिटल ओव्हरलोड होतं आहे, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे आणि एकाग्रता ढासळते.
advertisement
1/7
Reel पाहण्याची नशा फार वाईट, हे वाचून तुम्हाला बसेल शॉक!
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल फोनने मानवी जीवनात क्रांती घडवली आहे. तरी त्याचा अतिरेक आता आरोग्यावर विपरीत परिणाम करत असल्याचं स्पष्ट होत आहे.
advertisement
2/7
विशेषता सतत मोबाईलवर रिल्स, स्क्रोलिंग आणि व्हिडीओ पाहण्यामुळे मेंदूवर डिजिटल ओव्हरलोड होतं आहे, ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होणे आणि एकाग्रता ढासळते, याविषयीची माहिती लोकल 18 ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मधुर राठी यांनी दिली आहे.
advertisement
3/7
डॉ. राठी सांगतात, आपल्या मेंदूमध्ये नैसर्गिकरित्या तयार होणारं डोपामिन हे रसायन आपल्याला आनंद देतं, लक्ष केंद्रित करण्यास मदत करतं. मात्र, सतत रिल्स पाहिल्यामुळे या डोपामिनचं असंतुलन निर्माण होतं.
advertisement
4/7
त्यामुळे मेंदूची नैसर्गिक कार्यक्षमता कमी होते. या बदलांचा सर्वात मोठा परिणाम असा होतो की, एखादं महत्त्वाचं काम करताना लक्ष लागत नाही, विसरभोळेपणा वाढतो आणि झोपेचा दर्जाही खालावतो.
advertisement
5/7
पूर्वी टेलिफोनच्या काळात शेकडो फोन नंबर लोकांना तोंडपाठ असायचे. मात्र, आज ‘सेव्ह कॉन्टॅक्ट’ आणि ‘वन टच कॉल’च्या सुविधेमुळे स्वतःचा नंबरही अनेकांना लक्षात राहत नाही.
advertisement
6/7
मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदू सतत तंत्रज्ञानावर अवलंबून राहतो. त्यामुळे मेंदूला वापरणं कमी होतं आणि तो आळशी बनतो.
advertisement
7/7
मोबाईलचा अतिवापर केवळ मोठ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर लहान मुलंही त्यात गुरफटलेली दिसतात. यामुळे झोपेवर परिणाम होतो, मानसिक तणाव वाढतो आणि संवाद कौशल्य कमी होतं. त्यामुळे मोबाईलचा वापर कामापुरता आणि मर्यादित ठेवण्याचा सल्ला डॉ. राठी यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Reel पाहण्याची नशा फार वाईट, हे वाचून तुम्हाला बसेल शॉक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल