TRENDING:

Health Tips: त्वचा अन् कोलेस्ट्रॉलसाठी पांढरा की पिंक, कोणता पेरू चांगला?

Last Updated:
प्रत्येक फळांमधून वेगवेगळे घटक आपल्या शरीराला मिळत असतात. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात पेरू विक्रीसाठी आलेले आहेत.
advertisement
1/7
Health Tips: त्वचा अन् कोलेस्ट्रॉलसाठी पांढरा की पिंक, कोणता पेरू चांगला?
फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. कारण की फळामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक आपल्याला मिळत असतात. ज्या ऋतूमध्ये जी फळे येत असतात ती आपण खाल्लेच पाहिजे.कारण की प्रत्येक फळांमधून वेगवेगळे घटक आपल्या शरीराला मिळत असतात. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात पेरू विक्रीसाठी आलेले आहेत. तर पेरू खाण्याचे काय फायदे होतात किंवा कुठला पेरू खावा पांढरा की पिंक? याविषयी माहिती आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी दिली आहे.
advertisement
2/7
पेरू खाणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक असतात तसेच मिनरल्स, व्हिटॅमिन देखील असतात.
advertisement
3/7
पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट फायबरचा मुख्य स्त्रोत आहे. तसंच जर आपण पेरू खाल्ला तर यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहतं.
advertisement
4/7
कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहायला मदत होते. तसेच पेरूमध्ये व्हिटॅमिन ए असतं आणि त्यामुळे आपलं जे डोळ्याचं आरोग्य आहे ते देखील चांगलं राहायला मदत होते. तसेच ज्यांना मधुमेह आहे ते देखील हा पेरू खाऊ शकतात, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.
advertisement
5/7
दिवसभरामध्ये एखादा फळ खायचं म्हणजे शंभर ते दीडशे ग्रॅम पेरू तुम्ही दिवसभरात खाऊ शकता. त्यामुळे कुठलाही परिणाम हा तुमच्यावर होणार नाही. तसेच ज्यांना कुठलाही आजार नाही अशा नॉर्मल व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये पेरूचा समावेश करावा.
advertisement
6/7
याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे आपली पचन प्रक्रिया देखील चांगली राहते. त्यासोबत पेरूमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे ते आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरतं.
advertisement
7/7
पांढरा पेरू आणि पिंक पेरूमध्ये मुख्य फरक असा आहे की पांढऱ्या पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर जास्त आहेत. पिंक पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट जास्त असतात त्यामुळे आपली स्किन चांगली राहायला देखील यामुळे मदत होते तर हा दोनमध्ये मुख्य फरक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये निश्चितच पेरूचा समावेश करावा, असंही आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: त्वचा अन् कोलेस्ट्रॉलसाठी पांढरा की पिंक, कोणता पेरू चांगला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल