Health Tips : तुम्हाला आहे शुगरचा त्रास? साखरेऐवजी कोणते पदार्थ खाल? आहार तज्ज्ञांनी दिला सल्ला
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
साखर खाल्ल्याने नेमकं काय होतं की आपण साखरेऐवजी कुठले पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकतो. याविषयी आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
1/5

आपण अनेक वेळा ऐकतो की मोठमोठे सेलिब्रिटी किंवा इतरही लोक त्यांच्या आहारामध्ये साखरेचा अजिबात समावेश करत नाहीत. या मागचे कारण म्हणजे की साखरेमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते, त्यासोबत तुमचं वजन देखील वाढतं. पण साखर खाल्ल्याने नेमकं काय होतं की आपण साखरेऐवजी कुठले पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकतो. याविषयी आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
2/5
साखर म्हणजे काय? एमटी कॅलरीज. साखरेपासून आपल्याला फार काही पौष्टिक घटक त्यावेळी तर कुठल्याही गोष्टी भेटत नाहीत. साखरेमध्ये बिना कामाच्या कॅलरीज असतात, त्या आपल्या बिलकुल कामाच्या नसतात. आता मला पण साखर न खाल्लेली बरी. साखरेऐवजी आपण आपल्या आहारात गुळाचा समावेश करू शकतो. कारण गूळ हा साखरेपेक्षा अधिक नैसर्गिक असतो. त्यामध्ये साखरेपेक्षा जास्त पोषक घटक आहेत.
advertisement
3/5
तसेच आपण मधाचा वापर देखील करू शकतो. मध देखील हेल्थसाठी चांगले आहे. तसेच आपण खजूर देखील वापरू शकतो. ज्या लोकांना मधुमेह नाहीये, अशांनी कधी कधी मध, गूळ किंवा खजूर आहारात समावेश करावा.
advertisement
4/5
तसेच ज्यांना मधुमेह नाही किंवा वजन जास्त आहे, अशांनी देखील गुळाचा समावेश आहारात करावा. गूळ चांगला आहे त्यामुळे घेताना तो किती घेऊ नये, प्रमाणामध्येच खावा. तसेच तुम्हाला जर लाडू करायचे असतील तर तुम्ही खजुराचा जास्त वापर करावा, ते अधिक फायदेशीर आहे.
advertisement
5/5
जर तुम्हाला काही गोड खाण्याची क्रेविंग झाली तर तुम्ही खजूर किंवा अंजीर देखील खाऊ शकता. कधीतरी स्टेवियाचा वापर केला तर चालतं. आणि विशेष म्हणजे लहान मुलांना साखरेपासून लांब ठेवावं म्हणजे त्यांना खूप लवकर साखरेचे पदार्थ खाण्यासाठी देऊ नये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : तुम्हाला आहे शुगरचा त्रास? साखरेऐवजी कोणते पदार्थ खाल? आहार तज्ज्ञांनी दिला सल्ला