
अन्न व औषध प्रशासन मंत्रालयातील लिपिक राजू ढेरिंगे याला लाच घेतल्याने पकडण्यात आल्याने मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आलेले आहे.असे असताना यामध्ये आता एक नवीन प्रकरण समोर आले असून मेडिकल व्यवसायिक निर्मल शर्मा यांनी आपल्याकडेही नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात असणारे राजू ढेंगरे आणि रामदास गाडे यांनी आपल्या मेडिकलचा परवाना सुरू ठेवण्यासाठी ५५ हजार रुपयाची लाच घेतल्याचे म्हणणे आहे. याबाबतचे एक स्टिंग ऑपरेशन देखील त्यांनी केले आहे.