TRENDING:

Summer Tips : उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा मिळवून देतील ‘हे’ पदार्थ, थकवा होईल दूर!

Last Updated:
उन्हाळ्याच्या दिवसातही संतुलित आहार घेणे गरजेचे असते. त्याचबरोबर आहारासोबत विविध पौष्टिक थंड पेये घेतल्यास उन्हाळा सुसह्य होण्यास मदत होते आणि आपले शरीर देखील तंदुरुस्त राहते.
advertisement
1/7
उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा मिळवून देतील ‘हे’ पदार्थ, थकवा होईल दूर!
उष्णतेचा कडाका आता चांगलाच वाढला आहे. उष्णता वाढल्याने भूक मंदावत असते. त्यामुळे प्रत्येक जण थंड पेय किंवा थंड खाद्यपदार्थ सेवन करण्याकडे जास्त कल ठेवत असतो. मात्र केवळ थंड पेय घेतल्याने आपल्या शरिराला पोषण मिळत नाही.
advertisement
2/7
म्हणून उन्हाळ्याच्या दिवसातही संतुलित आहार घेणे गरजेचे असते. त्याचबरोबर आहारासोबत विविध पौष्टिक थंड पेये घेतल्यास उन्हाळा सुसह्य होण्यास मदत होते आणि आपले शरीर देखील तंदुरुस्त राहते. वाढत्या उष्णतेत आपला आहार कसा असावा? याबद्दलचं आहार सल्लागार डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
उन्हाळ्यामध्ये शरीराला एक्स्ट्रा हायड्रेशनची गरज असते. त्यासाठी पाण्यासोबतच लिंबू पाणी, नारळ पाणी, ताक तसेच विविध फळांचे रस याचा समावेश आपण आहारात करायला हवा. उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते त्यामुळे मसालेदार आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळावेत.
advertisement
4/7
त्याचबरोबर पचायला जड असलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन देखील करू नये. हलकी आणि पचायला जड नसलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे, असं डॉक्टर अमृता कुलकर्णी सांगतात.
advertisement
5/7
रात्री सात वाजेनंतर जेवण करणे टाळावे. ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये पचनाचे विकार आपणास जाणवणार नाही. बाहेरील फास्ट फूड किंवा सकाळी बनवलेले खाद्यपदार्थ सायंकाळी खाणे किंवा सायंकाळी बनवलेले खाद्यपदार्थ सकाळी खाणे टाळावे.
advertisement
6/7
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बनवलेले खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. यामुळे ताजे बनवलेले खाद्यपदार्थ सेवन करावे. याचबरोबर मांसाहार करण्याचे प्रमाण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी करावे.
advertisement
7/7
उन्हाळ्यामध्ये फळांच्या रसाबरोबरच मुगाची खिचडी, मुगाची डाळ, वरण भात, पोळी असा साधा आणि सात्विक आहार घ्यावा, असं आवाहन आहार सल्लागार डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Tips : उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा मिळवून देतील ‘हे’ पदार्थ, थकवा होईल दूर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल