Holi Skin Care : बिनधास्त खेळा रंग, 'या' ट्रिक्स वापरा; त्वचेवर लागलेला पक्का रंगही सहज अगदी सहज निघेल!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Holi skin protection tips : रंग खेळताना काही लोकांना त्यांच्या त्वचेची खूप चिंता वाटते. हल्ली बरेच लोक सतर्क झाले आहेत आणि ते फार रासायनिक किंवा त्वचेला त्रास देणारे रंग वापरत नाहीत. मात्र तरीही कधीकधी त्वचेवर काही पक्के रंग लागतात आणि ते लवकर निघत नाहीत. आज आम्ही तुम्हाला यावर काही सोपे उपाय सांगत आहोत.
advertisement
1/7

होळी खेळताना तुम्ही आधीपासून जितकी काळजी घ्याल तितकं चांगलं. होळी खेळण्यापूर्वी त्वचेची काळजी कशी घ्यायची याबद्दल डॉ. अमरजीत सिंग यांनी सविस्तर माहिती दिली आहे. चाल पाहूया. त्यांचे मत काय आहे.
advertisement
2/7
डॉक्टरांनी सांगितले की, होळी खेळण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर आणि शरीराच्या उघड्या भागांवर नारळाचे तेल किंवा चांगले मॉइश्चरायझर लावा. यामुळे त्वचेवर एक संरक्षक थर तयार होतो, ज्यामुळे रंगांचे हानिकारक कण छिद्रांमध्ये जात नाहीत. यामुळे नंतर रंग काढणं सोपं जातं.
advertisement
3/7
बदलत्या हवामानामुळे त्वचा अधिक संवेदनशील होते. डॉ. सिंग यांच्या मते, या काळात निष्काळजीपणा करू नये. त्यामुळे होळी खेळण्यासाठी नैसर्गिक आणि हर्बल रंगच वापरा. काही स्वस्त रंगात काचेचे कण किंवा हानिकारक रसायने असण्याची शक्यता असते. जे चेहऱ्यावर घासल्यास जखम किंवा गंभीर संसर्ग होऊ शकतो.
advertisement
4/7
चेहऱ्यावर लागलेला पक्का रंग काढण्यासाठी लोक हार्ष साबण किंवा इतर रासायनिक उत्पादनांचा अवलंब करतात. मात्र डॉ. अमरजीत सिंग सांगितले की, जर चेहऱ्यावर पक्का रंग लागला असेल, तर प्रथम तो साध्या पाण्याने धुवा आणि तुमचा नियमित साबण वापरा. जर रंग निघत नसेल तर वारंवार घासू नका. जास्त घासल्याने त्वचा सोलली जाऊ शकते आणि जखम होऊ शकते.
advertisement
5/7
चेहऱ्यावरचा रंग काढण्यासाठी तुम्ही बेसन आणि हळदीचा लेप लावू शकता. मात्र हे लावल्यानंतरही चेहरा रगडु नका. चेहरा हळुवार धुवा. धीर धरा आणि रंग नैसर्गिकरित्या निघू लागेल.
advertisement
6/7
होळी खेळल्यानंतर त्वचेवर खाज सुटणे, जळजळ होणे किंवा पुरळ उठणे दिसून आले तर घरी स्वतः उपचार करण्याऐवजी ताबडतोब तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. होळीनंतर रुग्णालयात डोळ्यांच्या आणि त्वचेच्या समस्या असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होते असे अनेकदा दिसून येते. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी. असेही डॉक्टरांनी सांगितले.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Holi Skin Care : बिनधास्त खेळा रंग, 'या' ट्रिक्स वापरा; त्वचेवर लागलेला पक्का रंगही सहज अगदी सहज निघेल!