Health Tips : 20 रुपयांना मिळणाऱ्या एका चिप्सच्या पॅकेटात किती तेल असतं माहितीये? उत्तर ऐकून धक्का बसेल
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
दुकानात रंगीबेरंगी पॅकेट्स आणि फ्लेव्हर्समध्ये मिळणारे चिप्स खाणं बहुतेकांना आवडतात. परंतु हे चिप्स जितके कुरकुरीत आणि टेस्टी असतात तितकेच आरोग्यासाठी घातक देखील ठरतात. तेव्हा एका चिप्सच्या पॅकेटमध्ये किती तेल असते आणि यामुळे आरोग्यावर कसा परिणाम होतो याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/5

द नेक्ड साइंटिस्टच्या रिपोर्टनुसार एक पॅकेट चिप्सचं वजन 50 ग्रॅम असून यात त्याच्या वजनाच्या जवळपास 12 ते 13 प्रतिशद तेल असतं. तिथे काही चिप्सच्या पॅकेटमध्ये या तेलच प्रमाण 15 टक्क्यांहून देखील अधिक असतं.
advertisement
2/5
सर्वात मोठी गोष्ट अशी की पॅकेटमध्ये असलेले हे तेल ट्रान्स फॅट्स असते. जे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. स्पष्ट शब्दात सांगायचं झाल्यास हे तेल तुमच्या आरोग्यावर नुकसान पोहोचू शकते.
advertisement
3/5
काही महिन्यांपूर्वीच WHO ने जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, जगातील 5 अरब लोक ट्रान्स फॅट्समुळे गंभीर आजारपणाशी झुंज देत आहेत. चिप्सच्या पॅकेटमध्ये वापरण्यात येणार तेल हे ट्रान्स फॅट्स असते त्यामुळे जितक्या वेळा तुम्ही चिप्स खाता तितक्या वेळा तुम्ही आजारपणाला आमंत्रण देत असता.
advertisement
4/5
WHO च्या रिपोर्टनुसार 100 ग्रॅमच्या चिप्स पॅकेटमध्ये 2 ग्रॅमहून जास्त ट्रान्स फॅट्स असते. बाजारात उपलब्ध असलेली बहुतांश उत्पादने या मानकांची पूर्तता करत नाहीत.
advertisement
5/5
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने जानेवारी 2022 मध्येच खाद्यपदार्थांबाबत अनेक नियम लागू केलेले आहेत. पण बाजारात विकली जाणारी काही उत्पादने या मानकांचे पालन करत नाहीत. म्हणून, बाजारात उपलब्ध असलेले तळलेले पदार्थ शक्य तितके खाणे टाळावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips : 20 रुपयांना मिळणाऱ्या एका चिप्सच्या पॅकेटात किती तेल असतं माहितीये? उत्तर ऐकून धक्का बसेल