TRENDING:

Beauty Tips : गालावर खळी पडत नाही, पण आवडते? 'या' ट्रिक्सने मिळू शकतात प्रियदर्शनीसारख्या सुंदर खळ्या..

Last Updated:
How to get dimples naturally : सौंदर्याची अशी अक्षी काही ठराविक व्याख्या नसते. ती प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि दृष्टीकोनानुसार बदलते. असाच काहीसं असतं गालावर खळी पडणाऱ्या लोकांच्या बाबतीत. काहींना खळी पडलेली आवडते, तर काहींना आवडत नाही. मात्र ज्या लोकांना खळी पडलेली आवडते, त्यातल्या बहुतांश लोकांची खळी पडत नाही. पण यावरही काही उपाय आहेत. चला पाहूया कोणते.
advertisement
1/7
गालावर खळी पडत नाही, पण आवडते? 'या' ट्रिक्सने मिळतील प्रियदर्शनीसारख्या खळ्या..
Myupachar मध्ये दिलेल्या माहितीनुसार, वैज्ञानिकदृष्ट्या गालावर खळ्या लहान स्नायूंच्या विकृतीमुळे पडतात. या विकृतीमुळे गालांची त्वचा घट्ट होते. या विकृतीमध्ये त्वचा कधीकधी बाहेरून फुगूही शकते. संशोधनानुसार, डिंपल्स आनुवंशिक असतात.
advertisement
2/7
गालावर पडणाऱ्या खळ्या खरं तर जन्मतः आणि नैसर्गिक असतात. त्यामुळे खळ्या आधीपासून नसताना त्या मिळवणं थोडं अवघड असू शकतं. पण यासाठी काही चेहऱ्याचे व्यायाम तुमची मदत करू शकतात. गालावर नैसर्गिकरित्या खळ्या तयार करण्याचा हा एक मार्ग आहे.
advertisement
3/7
पहिला व्यायाम : तुमचे ओठ बाहेर करा आणि गाल आत खेचा. तुमचे गाल दातांवर घट्ट दाबून ठेवा आणि काही सेकंद ओठ बंद ठेवा. या व्यायामामुळे तुमच्या गालावर खळ्या पडण्यास मदत होईल.
advertisement
4/7
दुसरा व्यायाम : तुमच्या गालावर जिथे तुम्हाला खळ्या हव्या आहेत त्या ठिकाणी एखादा पेन किंवा बोटाने दाब द्या. दाबताना एक लांब हास्य ठेवा. यानेही कालांतराने तुमच्या गालावर खळ्या पडण्यास मदत होईल.
advertisement
5/7
तिसरा व्यायाम : या व्यायामामध्ये तुम्हाला गालावर बोट किंवा एखादी पेन्सिल, पेन ठेवायचे आहे. यावेळी दिलखुलास हसा. हसल्यावरच गालावरच्या खळ्या स्पष्टपणे दिसतात. म्हणून गालावर बोट ठेवून हसा. याने गालावर खळ्या पडण्यास सुरुवात होईल.
advertisement
6/7
चौथा व्यायाम : यावेळी गाल दोन्ही हातांनी हलके ओढा आणि मोठ्याने हसा. से केल्यानं ओठांमधील स्नायू तुमच्या कानांकडे जातात. यामुळे तुमच्या तोंडाभोवती रेषा तयार होतील आणि तुमच्या गालावर नैसर्गिकरित्या डिंपल तयार होण्यासाठीमदत होईल.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Beauty Tips : गालावर खळी पडत नाही, पण आवडते? 'या' ट्रिक्सने मिळू शकतात प्रियदर्शनीसारख्या सुंदर खळ्या..
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल