Banana : केळी नैसर्गिक पिकलेली की केमिकलने? फक्त देठाचा रंग पाहून ओळखा, ही ट्रिक लक्षात ठेवा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
गृहिणींनी आणि ग्राहकांनी ही केळी ओळखण्याची कला शिकून घेणं गरजेचं आहे. ऋषिकेश येथील गृहिणी पूनम यांनी केळी ओळखण्याच्या काही अत्यंत सोप्या आणि प्रभावी टिप्स सांगितल्या आहेत.गृहिणींनी आणि ग्राहकांनी ही केळी ओळखण्याची कला शिकून घेणं गरजेचं आहे. ऋषिकेश येथील गृहिणी पूनम यांनी केळी ओळखण्याच्या काही अत्यंत सोप्या आणि प्रभावी टिप्स सांगितल्या आहेत.
advertisement
1/8

लहान मुलांपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचं फळ म्हणजे केळं. अगदी सगळ्याच सिझनमध्ये उपलब्ध असतं. भूक लागली की पटकन सोलून खाता येणारं, खिशाला परवडणारं आणि शरीराला इन्स्टंट एनर्जी देणारं हे फळ प्रत्येक घरात आढळतं. आपण बाजारात जातो तेव्हा फळविक्रेत्याकडे असलेली ती पिवळीधमक केळी बघून आपल्याला ती खाण्याची इच्छा होते. आपण हौसेने डझनभर केळी घरी आणतो, पण कधी विचार केलाय का की, इतकी 'परफेक्ट' दिसणारी केळी तुमच्या आरोग्यासाठी किती घातक असू शकतात?
advertisement
2/8
आजकाल बाजारात मागणी वाढली की व्यापाऱ्यांकडून कच्चे केळे झटपट पिकवण्यासाठी केमिकल्सचा सर्रास वापर केला जातो. हे केमिकलने पिकवलेले केळे दिसायला सुंदर असले तरी ते आतून विषारी असू शकतात. म्हणून गृहिणींनी आणि ग्राहकांनी ही केळी ओळखण्याची कला शिकून घेणं गरजेचं आहे. ऋषिकेश येथील गृहिणी पूनम यांनी केळी ओळखण्याच्या काही अत्यंत सोप्या आणि प्रभावी टिप्स सांगितल्या आहेत.
advertisement
3/8
1. देठ नीट तपासाकेळं नैसर्गिक आहे की केमिकलने पिकवलेलं, हे ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे त्याचं देठ पाहणे.जर केळ्याचं देठ काळपट किंवा गडद हिरव्या रंगाचं असेल, तर समजावं की ते झाडावर नैसर्गिकरीत्या पिकलेलं आहे.जर पूर्ण केळं पिवळधमक आहे पण त्याचं देठ पांढरं किंवा एकदम वाळलेलं दिसत असेल, तर ते केमिकलच्या साहाय्याने पिकवलेलं असण्याची दाट शक्यता असते.
advertisement
4/8
2. रंग आणि डागांवरून ओळखाअनेकांना वाटतं की केळ्यावर काळे डाग असले की ते खराब झालं. पण वास्तव वेगळं आहे.नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळ्यावर छोटे छोटे तपकिरी किंवा काळे ठिपके असतात. त्याचा रंग सर्व ठिकाणी एकसारखा पिवळा नसतो, कुठे थोडा हिरवा तर कुठे पिवळा असा छटांचा खेळ त्यात दिसतो.तर केमिकलने पिकवलेली केळी ही 'एक्स्ट्रा' पिवळी आणि चकाकणारी दिसतात. त्यावर कुठेही डाग नसतात, ती दिसायला खूपच आकर्षक असतात. पण लक्षात ठेवा, जे जास्त चकाकतं ते नेहमीच चांगलं नसतं.
advertisement
5/8
3. चव आणि सुवास महत्त्वाचाकेळं खाताना किंवा हातात घेतल्यावरही तुम्ही त्याची शुद्धता तपासू शकता.नैसर्गिक केळं हे आतून मऊ, रसाळ आणि गोड असतं. त्याला एक विशिष्ट गोड सुवास येतो.केमिकलने पिकवलेली केळी बाहेरून मऊ दिसली तरी आतून अनेकदा कडक किंवा बेचव लागतात. काही वेळा त्यांना औषधांसारखा वेगळा वासही येतो.
advertisement
6/8
केमिकलची केळी आरोग्यासाठी धोकादायक का?तज्ज्ञांच्या मते, कॅल्शियम कार्बाइडसारख्या रसायनांचा वापर करून पिकवलेली फळे खाल्याने पोटाचे विकार, डोकेदुखी, चक्कर येणे आणि दीर्घकाळ सेवन केल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात. नैसर्गिक केळ्यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात, जे केमिकलमुळे नष्ट होतात.
advertisement
7/8
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही केळी विकत घ्यायला जाल, तेव्हा फक्त रंगावर जाऊ नका. थोडी जागरूकता दाखवली तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवू शकता. लक्षात ठेवा, नैसर्गिक फळं दिसायला थोडी सामान्य असली तरी गुणांनी ती 'असामान्य' असतात.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Banana : केळी नैसर्गिक पिकलेली की केमिकलने? फक्त देठाचा रंग पाहून ओळखा, ही ट्रिक लक्षात ठेवा