TRENDING:

Real Vs Fake Silver : तुम्ही नकली चांदीचे दागिने तर घालत नाही? या 5 पद्धतींनी घरीच पारखता येते चांदीची शुद्धता..

Last Updated:
Real VS Fake Silver Jewelry : सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा आणि घालण्याचा छंद अनेकांना असतो. चांदीबाबत सांगायचे तर महिला ती दैनंदिन वापरातही घालणे पसंत करतात. सध्या सोने-चांदीचे दर गगनाला भिडले आहेत, अशा परिस्थितीत चांदी खरेदी करताना ती खरी आहे की बनावट, याची नीट तपासणी करूनच दागिने घ्यावेत.
advertisement
1/7
तुम्ही नकली चांदीचे दागिने तर घालत नाही? या पद्धतीने घरीच पारखा चांदीची शुद्धता
आता चांदीही सोन्यासारखीच महाग झाली आहे. लोक चांदी खरेदीसाठी रांगा लावत आहेत. आधी सोनं घ्यायला भीती वाटायची. आता चांदीमागे लोक धाव घेत आहेत. जेव्हा एक किलो चांदीची किंमत फक्त एक लाख रुपये होती, तेव्हा कुणी फारसे लक्ष दिले नव्हते. पण आता किंमत तीन लाखांच्या पुढे गेली असून चार लाखांकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे लोक खरेदीसाठी धाव घेत आहेत. अनेक जण तर पैसे उधार घेऊनही चांदीत गुंतवणूक करत आहेत. कारण मार्केट एक्सपर्ट्स सांगत आहेत की, चांदीची किंमत दुप्पट होऊ शकते. याच अपेक्षेने लोक तीन लाख रुपये देऊन एक किलो चांदी खरेदी करत आहेत आणि काही महिन्यांत तिची किंमत सहा लाख होईल अशी आशा ठेवत आहेत.
advertisement
2/7
सध्या चांदीची किंमत किलोमागे सुमारे 3,60,000 रुपये आहे. मात्र काही लोक याच संधीचा फायदा घेत बनावट चांदी विकत आहेत. खरेदीदारांना ती खरी आहे की नकली, हे कळत नाही आणि त्यामुळे ते सहज फसवले जातात. अनेक ठिकाणी बनावट चांदीचा हा धंदा उघडकीसही आला आहे. म्हणूनच आपण खरेदी करत असलेली चांदी खरी आहे की बनावट, हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
3/7
हॉलमार्क : चांदी खरेदी करताना सर्वात आधी हॉलमार्क नक्की तपासा. त्यावर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चे लोगो, 925 ग्रेड (92.5% शुद्ध चांदी) ची माहिती आणि ज्वेलरची ओळख दर्शवणारे चिन्ह आहे की नाही, हे पाहा. ही सर्व चिन्हे असतील तर तुमची चांदी बनावट नाही. हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांमध्ये बनावट असण्याची शक्यता जास्त असते. नव्या नियमांनुसार चांदीसाठी सात शुद्धतेचे ग्रेड असतात. ते म्हणजे 800, 835, 925, 958, 970, 990, 999. हॉलमार्कमध्ये ‘SILVER’ असे लिहिलेले असते, BIS चे चिन्ह, शुद्धतेचा ग्रेड आणि HUID कोडही असतो.
advertisement
4/7
चुंबक चाचणी : खरी चांदी चुंबकाला चिकटत नाही. तुमच्याकडील चांदी चुंबकाजवळ धरून पाहा. जर ती चुंबकाला चिकटली, तर त्यात लोखंड किंवा निकेलसारख्या इतर धातूंची भेसळ असण्याची शक्यता आहे. ही एक अतिशय सोपी चाचणी आहे, मात्र अचूक निष्कर्षासाठी इतर पद्धतींसोबतही तपासणी करणे चांगले.
advertisement
5/7
काळी पडण्याची चाचणी : हवा किंवा सल्फरच्या संपर्कात आल्यावर खरी चांदी काळी पडते. मात्र ती मऊ कापडाने साफ केली तर पुन्हा चमकू लागते. बनावट चांदी सहसा काळी पडत नाही आणि रंग बदललाच तरी साफ केल्यावर तिची चमक परत येत नाही. जुनी चांदी साफ केल्यानंतर जर नव्यासारखी चमक आली, तर ती खरी असल्याचे समजावे.
advertisement
6/7
आवाज चाचणी : चांदीला दुसऱ्या धातूला हलकेच टच केल्यावर स्वच्छ आणि घंटीसारखा आवाज येतो. हा आवाज काही सेकंद ऐकू येतो. जर चांदी बनावट असेल किंवा फक्त चांदीचा लेप दिलेला असेल, तर त्यातून जड आणि बोथट आवाज येतो. तज्ज्ञ या पद्धतीने सहज ओळख पटवतात.
advertisement
7/7
आइस क्यूब चाचणी : सर्व धातूंमध्ये चांदीची उष्णता वहनक्षमता सर्वाधिक असते. जर तुम्ही चांदीच्या वस्तूवर बर्फाचा तुकडा ठेवला, तर तो लवकर वितळतो. मात्र वस्तू बनावट असल्यास बर्फ वितळायला अधिक वेळ लागतो. चांदीची शुद्धता ओळखण्याची ही एक सोपी आणि रंजक पद्धत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Real Vs Fake Silver : तुम्ही नकली चांदीचे दागिने तर घालत नाही? या 5 पद्धतींनी घरीच पारखता येते चांदीची शुद्धता..
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल