प्रसिद्ध मराठमोळ्या रिलस्टारचा मृत्यू; आईही आहे फेमस, मायलेक एकत्र करायचे VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
Social Media Star Prathamesh Kadam Death : सोशल मीडियावर फेमस असलेल्या मराठमोळ्या मायलेकाच्या जोडीतील मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे.
advertisement
1/7

सोशल मीडियावर कितीतरी स्टार आहेत, त्यापैकीच फेमस असलेली एक मराठमोळ्या मायलेकाची जोडी. या जोडीतील एक स्टार हरपला आहे. मराठी रिलस्टारचा मृत्यू झाला आहे. प्रथमेश कदम असं त्याचं नाव.
advertisement
2/7
सोशल मीडिया स्टार आणि प्रथमेशचा मित्र तन्मय पाटेकरने प्रथमेश कदमच्या निधनाची माहिती दिली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
advertisement
3/7
तन्मय म्हणाला, 'तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश, देवाघरी स्वतःची काळजी घे रे ! खूप आठवण येईल तुझी Miss You Bhai.
advertisement
4/7
प्रथमेश कदमचे बरेच व्हिडीओ तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील. त्याने त्याची आई आणि बहिणीसोबतही बरेच व्हिडीओ बनवले आहे.
advertisement
5/7
प्रथमेश आईही सोशल मीडियावर खूप फेमस आहे, प्रज्ञा कदम असं तिचं नाव. तिचं स्वत:चं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे, जिथं तिचे डान्सचेही व्हिडीओ पाहायला मिळतील.
advertisement
6/7
प्रथमेशने डिसेंबर 2025 मध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात त्याने त्याची फसवणूक झाल्याचं सांगितलं होतं. तसंच तो आजारीही होता. तरी त्याने लोकांचं मनोरंजन करणं थांबवलं नाही. हॉस्पिटलमधूनही त्याने मजेशीर व्हिडीओ केले होते.
advertisement
7/7
5 जानेवारीला त्याने त्याच्या नवीन गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. तोच त्याचा शेवटचा व्हिडीओ, त्यानंतर त्याची काही पोस्ट नाहीये. त्यानंतर आता अचानक त्याच्या निधनाचीच बातमी आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध मराठमोळ्या रिलस्टारचा मृत्यू; आईही आहे फेमस, मायलेक एकत्र करायचे VIDEO