TRENDING:

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणातील PSI बदनेला जामीन मंजूर, पण 'या' 3 अटी घातल्या...

Last Updated:

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
News18
News18
advertisement

23 ऑक्टोबर 2025 रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली होती. बदने गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याने जामिनासाठी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.

advertisement

काय झालं कोर्टात? 

महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी तिच्या हातावर एक नोट लिहिली होती. पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे लिहून त्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले होते. त्यामुळे फलटण पोलिसांनी गोपाळ बदनेसह प्रशांत बनकरला अटक केल होती. या प्रकरणानंतर राड्यात संतापाची लाट उसळली होती. अखेर कोर्टाने युक्तिवाद ऐकल्यानंतर पाच महिन्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरी गोपाळ बदनेला तीन अटी घातल्या आहेत.

advertisement

काय अटी घातल्या आहेत?

  • जामीनानंतर बाहेर गेल्यानंतर कोणत्याही प्रकारे फिर्यादी पक्षाच्या साक्षीदारांवर दबाब आणू नये तसेच फिर्यादी पक्षाच्या पुराव्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार करायचा नाही.
  • सुनावणीच्या प्रत्येक तारखेला हजर राहिला पाहिजे. तपास अधिकाऱ्याकडे आधार आणि पॅनकार्ड, सविस्तर पत्ता, फोन नंबर, जवळच्या दोन नातेवाईकांची माहिती द्यावी.
  • कोणत्या अटीचा भंग केल्यास जामीन रद्द करण्यात येईल.
  • advertisement

महिला डॉक्टरने हातावर काय लिहिलं होतं?

महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोटच्या स्वरूपात काही वाक्ये लिहिली होती. या मजकुरात त्यांनी नमूद केले आहे की, “पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला. या धक्कादायक खुलाशानंतर पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

advertisement

हे ही वाचा :

काळ्या रंगाच्या पोत्यात बॉडी भरली, Hyundai कारमध्ये... बार्शीमध्ये घरमालकिणीच्या दागिन्यांसाठी भाडेकरूचं भयानक कांड

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आरोग्यासाठी हेल्दी, झटपट तयार करा चण्याच्या पिठाचा पोळा, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षाला अटक, बीड पोलिसांची मोठी कारवाई; 10 वर्षापूर्वी केलं होतं मोठं कांड

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणातील PSI बदनेला जामीन मंजूर, पण 'या' 3 अटी घातल्या...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल