Sonam Kapoor : डिलीव्हरीनंतर पहिल्यांदाच समोर आली सोनम कपूर; मावशी रियाने बाळाची झलक दाखवली, आईने शेअर केला पहिला PHOTO
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sonam Kapoor Baby Photo : प्रेग्नन्सीमध्येही एक्टिव्ह असलेली सोनम कपूर डिलीव्हरीनंतर पहिल्यांदाच समोर आली आहे. तिने तिच्या दुसऱ्या बाळासोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री सोनम कपूर जी नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे, प्रेग्नन्सीमध्येही ती खूप एक्टिव्ह होती. वेगवेगळ्या कार्यक्रमांना ती जात होती, जाहिराती करत होती आणि सोशल मीडियावर आपले फोटोही शेअर करत होती.
advertisement
2/7
29 मार्च 2026 रोजी तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. आपल्याला मुलगा झाल्याची गोड बातमी सोनम आणि तिचा नवरा आनंद आहुजाने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली.
advertisement
3/7
यानंतर सोनमची बहीण रियाने म्हणजे बाळाच्या मावशीने सोशल मीडियावर बाळाची पहिली झलक दाखवली. रियाने सोनमच्या दुसऱ्या बाळासोबतचा आपला फोटो शेअर केला.
advertisement
4/7
यानंतर आता सोनम कपूरही पुन्हा सोशल मीडियावर एक्टिव्ह झाली आहे. डिलीव्हरीनंतर तिने आपला पहिला फोटो शेअर केला आहे.
advertisement
5/7
सोनमने हॉस्पिटलमधून आपला फोटो शेअर केला आहे. ज्यात तिनेही तिच्या बाळाची झलक दाखवली आहे. फोटोमध्ये ती बेडवर आहे आणि तिने आपल्या बाळाला कुशीत घेतलं आहे. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आहे.
advertisement
6/7
सोनम आणि आनंद यांचं लग्न मार्च 2018 मध्ये झालं होतं. या कपलने ऑगस्ट 2022 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव वायू आहे.
advertisement
7/7
आता सोनम-आनंद यांच्या दुसऱ्या मुलाची झलक पाहिल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sonam Kapoor : डिलीव्हरीनंतर पहिल्यांदाच समोर आली सोनम कपूर; मावशी रियाने बाळाची झलक दाखवली, आईने शेअर केला पहिला PHOTO