TRENDING:

How to know real garlic : लसूण बनावट आहे की नाही कसं ओळखायचं? खरेदी करण्याआधी वाचा या टिप्स

Last Updated:
How to know real garlic : अकोल्यात सिमेंटचा लसूण सापडले आहेत. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. अशावेळी लसूण खरेदी करताना तुमची फसवणूक टाळण्यासाठी नेमकं काय करायचं जाणून घ्या सोप्या टिप्स
advertisement
1/7
लसूण बनावट आहे की नाही कसं ओळखायचं? खरेदी करण्याआधी वाचा या टिप्स
गेल्या काही दिवसांपासून बाराजात प्रत्येक गोष्टीत भेसळ होताना दिसत आहे. अगदी तांदूळ-डाळीपासून ते फोडणीच्या पदार्थापर्यंत, तेलापर्यंत भेसळ असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता त्यातच आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.
advertisement
2/7
अकोल्यात सिमेंटचा लसूण सापडले आहेत. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या लसणीच्या पाकळ्याही वेगळ्या होत नव्हत्या. जेव्हा त्याने नीट पाहिला तेव्हा लक्षात आलं तो संपूर्ण लसूण सिमेंचा आहे. तेव्हा ग्राहकाच्या पायाखालची जमीन सरकली.
advertisement
3/7
अगदी डाळ, भाज्या, चटणी किंवा नॉनव्हेजमध्ये आवर्जून लसूण वापरला जातो. हा फक्त सिमेंटचाच नाही तर चीनमधूनही बनावट लसूण येत असल्याचं गेल्या काही दिवसांपूर्वी धक्कादायक वृत्त समोर आलं होतं. मग लसूण खरेदी करताना ही फसवणूक टाळण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी जाणून घेणार आहोत.
advertisement
4/7
भेसळयुक्त लसूण हा संपूर्ण पांढरा शुभ्र असतो. त्याच्या पाकळ्याही घट्ट असतात. त्या सहज निघत नाहीत. तर खऱ्या ओरिजनल लसणीची प्रत्येक पाकळी तुम्ही वेगळी करून सोलू शकता.
advertisement
5/7
लसूण ही शुभ्र पांढरी नसते. त्यावर हलसे पिवळट, गुलाबी किंवा थोडी वेगळी छटा या पाकळ्यांवर असते. लसूण भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी लसणीच्या वरचा आणि टोकाचा भाग आवर्जून तपासावा.
advertisement
6/7
तळाशी एक डाग दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तो खरा, खऱ्या लसणीचा एक वेगळा उग्र वास असतो. शिवाय लसूण हाताळताना त्याच्या काही पाकळ्या वेगळ्याही होतात. कधीकधी शिवाय तो नीट साठवला नाही तर तो खराबही होतो.
advertisement
7/7
गावरान लसूण हायब्रिडपेक्षा वेगळा दिसतो. त्यामुळे तो सहज ओळखणं शक्य आहे. मात्र हायब्रिड लसूणमध्ये सध्या सऱ्हास भेसळ होत असल्याने तो ओळखणं थोडं कठीण आहे. पण सतर्क राहून जर तुम्ही खरेदी केली तर तुमची फसवणूक होणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
How to know real garlic : लसूण बनावट आहे की नाही कसं ओळखायचं? खरेदी करण्याआधी वाचा या टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल