Mango : पिकलेले आंबे लवकर खराब होणार नाहीत, साठवताना लक्षात ठेवा 5 टिप्स
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
उन्हाळा हा आंब्यांचा सिझन असून सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक झालेली आहे. आंबे प्रेमी अनेक डझन आंबे घरी आणतात परंतु काहीवेळा उन्हामुळे पिकलेले आंबे लवकर खराब होऊ लागतात. तेव्हा पिकलेले आंबे खराब होऊ नयेत यासाठी त्यांना साठवताना काही टिप्स लक्षात घ्या.
advertisement
1/5

पिकलेले आंबे लवकर खराब होऊ नये असे वाटत असेल तर आंबे तुम्ही कागदाच्या पिशवीत ठेऊ शकता. कागदी पिशवी अतिरिक्त ओलावा शोषून घेते ज्यामुळे आंबे लवकर खराब होत नाहीत.
advertisement
2/5
पिकलेले आंबे साठवण्यापूर्वी आंब्यांचे नीट निरीक्षण करा. जे आंबे खूप जास्त पिकले असतील किंवा नरम झाले असतील असे आंबे कापून त्यांचा आमरस तयार करून फ्रिजमध्ये स्टोर करा. तर जे आंबे पिकलेले पण थोडे कडक असतील असे आंबे कागदी पिशवीत ठेऊन द्या.
advertisement
3/5
पिकलेले आंबे साठवायचे असतील तर ते आंबे सोलून त्याचे तुकडे करा. तसेच कापलेल्या आंब्यांच्या फोडींवर साखर शिंपडा आणि 2 ते 3 तास फ्रिजमध्ये ठेवा. मग हे तुकडे एअर टाईट डब्यात ठेवा आणि फ्रिजमध्ये स्टोअर करा. याप्रकारे पिकलेले आंबे 1 ते 2 महिने फ्रेश राहतील.
advertisement
4/5
पिकलेले आंबे जास्त काळ साठवायचे असतील तर ते तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊ शकता. पिकलेला आंबा फ्रिजमध्ये ठेवल्यास तो सहा दिवस टिकतो परंतु यासाठी फ्रिजचे तापमान 4°C वर सेट करणे आवश्यक आहे.
advertisement
5/5
पिकलेले आंबे दीर्घकाळ साठवण्यासाठी आंब्याचा गर काढून घ्या आणि तो आईस ट्रेमध्ये भरून फ्रिज करा, मग फ्रिज झालेले क्युब्स काढून एका झिपलॉक बॅगमध्ये भरा, असे केल्याने आंब्याचा गर बराच काळ साठवून ठेऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mango : पिकलेले आंबे लवकर खराब होणार नाहीत, साठवताना लक्षात ठेवा 5 टिप्स