TRENDING:

पार्कमध्ये वाटतं खूप थंड? Don't worry घरीच करा 'ही' आसनं

Last Updated:
हिवाळ्यात सर्दी-खोकला होणं सामान्य आहे. या काळात हाडंदेखील दुखतात. अंग आकडल्यासारखं वाटतं. शिवाय बाहेर शेतपावली घालायचं म्हटलं, तर बाहेर सकाळ-संध्याकाळ थंडगार वारे वाहत असतात. परंतु शरिराला व्यायाम हवाच. त्यामुळे आज आपण घरी करता येतील अशी सोपी आसनं पाहूया.
advertisement
1/7
पार्कमध्ये वाटतं खूप थंड? Don't worry घरीच करा 'ही' आसनं
या आसनात आपण श्वास जसजसा आत घेतो तसे हात वर उचलायचे आणि श्वास सोडताना हात खाली घ्यायचे. जितक्या वेळा शक्य आहे तितक्या वेळा हे आसन करावं.
advertisement
2/7
सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी वज्रासन उपयुक्त आहे. क्षमतेनुसार शक्य तितका वेळ या स्थितीत बसावं. चटई किंवा चादर अंथरून हे आसन करावं.
advertisement
3/7
बोटांची उघडझाप करण्याच्या या आसनामुळे हात, मनगट आणि बोट मजबूत होतात. त्याचबरोबर बोटांमध्ये लवचिकतादेखील येते.
advertisement
4/7
या आसनात हाताची मूठ क्लॉक वाइज आणि अँटी क्लॉक वाइज फिरवावी. यामुळे हाताची हाडं आणि पेशी मजबूत राहतात.
advertisement
5/7
या आसनात बसून दोन्ही पाय सरळ समोर न्यावे. तळवे एकमेकांना जोडून पुढच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर पाय क्लॉक वाइज आणि अँटी क्लॉक वाइज फिरवावे.
advertisement
6/7
या आसनात दोन्ही पाय समोर ठेवून बसावं. आता गुडघ्यातून पाय वाकवून सरळ करावे. शक्य तितक्या वेळा ही क्रिया करावी.
advertisement
7/7
टाळी वाजवणं हेदेखील एक उत्तम आसन आहे. टाळी जर योग्यरित्या वाजवली तर तिचे अनेक फायदे होतात. परंतु अट एकच की, टाळी तोपर्यंत वाजवावी जोपर्यंत हात लाल होत नाहीत आणि तुम्ही थकत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
पार्कमध्ये वाटतं खूप थंड? Don't worry घरीच करा 'ही' आसनं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल