TRENDING:

Indian Idol Winner Heart Attack : इंडियन आयडॉल विजेत्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू; थंडीत वाढतो धोका, 8 लक्षणं लक्षात ठेवा

Last Updated:
Indian Idol Winner Prashant Tamang Heart Attack Death : 'इंडियन आयडॉल सीझन 3'चा विजेता प्रशांत तमांगचाही हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आहे. हार्ट अटॅक कोणत्याही ऋतूत येऊ शकतो, पण त्याचा धोका हिवाळ्यात जास्त असतो.
advertisement
1/7
इंडियन आयडॉल विजेत्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू; थंडीत वाढतो धोका, दिसतात 8 लक्षणं
हार्ट अटॅक</a> आल्याची शक्यता वर्तवली जात आहे." width="1600" height="900" /> 'इंडियन आयडॉल सीझन 3'चा विजेता प्रशांत तमांगचे वयाच्या 43 व्या वर्षी निधन झालं आहे. नवी दिल्लीत राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला. प्राथमिक अहवालांनुसार त्या हार्ट अटॅक आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
2/7
हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. कारण थंडीत शरीर उबदार ठेवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते.  थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि हृदयाच्या स्नायूंना कमी ऑक्सिजन मिळतो आणि त्यांच्यावर ताण पडून हृदयविकाराचं प्रमाण वाढतं.
advertisement
3/7
थंडीमुळे शरीराचं तापमान कमी झाले की शरीरातील रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
advertisement
4/7
हिवाळ्यामध्ये शरीरातील प्लेटलेट्स एकत्र येण्याची शक्यता जास्त असते. यामुळे रक्त घट्ट होते आणि क्लॉट्स वाढण्याची शक्यता वाढते. या सर्व बदलांमुळे हृदयाला आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जास्त असते.
advertisement
5/7
ज्यांना आधीच हृदयरोग, हृदयाशी संबंधित समस्या, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, ज्यांचं वजन जास्त आहे. ज्यांना डायबिटीजची समस्या आहे अशांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यांच्यासाठी अधिकची थंडी ही धोकादायक ठरू शकते. त्यांना थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 31% वाढतो. त्यामुळे थंडीच्या काळात हृदयाला अतिरिक्त काळजी घ्यावी लागते.
advertisement
6/7
ज्या व्यक्ती जास्त धूम्रपान, मद्यपान करतात अशा व्यक्तींना थंडीत हृदयविकाराचा त्रास वाढतो. त्यामुळे त्यांनी थंडीत आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते.
advertisement
7/7
छातीत जडपणा किंवा वेदना, श्वास घेण्यास त्रास, थकवा जाणवणे, हात, जबडा किंवा पाठीत वेदना, अचानक घाम येणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणं हार्ट अटॅक येण्याआधी दिसतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Indian Idol Winner Heart Attack : इंडियन आयडॉल विजेत्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू; थंडीत वाढतो धोका, 8 लक्षणं लक्षात ठेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल