Induction Vs Infrared : इंडक्शन की इन्फ्रारेड, कोणतं कूकटॉप तुमच्यासाठी आहे चांगलं? कशाला लागते कमी वीज?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Kitchen Tips : हल्ली गॅसपेक्षा लोक इलेक्ट्रिक कूकटॉपला जास्त प्राधान्य देत आहेत. त्यातही इंडक्शनचा वापर जास्त प्रमाणात होतो. मात्र इंडक्शनप्रमाणेच इन्फ्रारेड कुकटॉपदेखील असतं. तर इंडक्शन आणि इन्फ्रेरेड या दोन्हींपैकी काय जास्त फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
1/9

इंडक्शनचे फायदे, त्याचा वापर आणि त्याची काळजी कशी घ्याची याबद्दल सर्वांना माहित आहे आणि आता तर जास्त लोकांना याबद्दल माहिती झाली आहे. पण इन्फ्रारेड कूकटॉप नेमकं कसं काम करतं आणि ते आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं का? इंडक्शन चांगलं की इन्फ्रारेड? चला पाहूया.
advertisement
2/9
इंडक्शन आणि इन्फ्रारेड कूकटॉपमधील फरक : सर्वात आधी इंडक्शनबद्दल बोलायचं झालं तर, इंडक्शनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक टेक्नॉलॉजीचा वापर होतो आणि इन्फ्रारेडमध्ये हॅलोजन लाईट आणि रॅडियन्ट हीट म्हणजेच तीव्र उष्णतेचा वापर होतो.
advertisement
3/9
कूकटॉप्सवर वापरल्या जाणाऱ्या भांड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर इन्फ्रारेड कुकटॉप चांगले आहेत कारण त्यावर तुम्ही स्टेनलेस स्टील, ॲल्युमिनियम, तांबे, माती किंवा काचेपासून बनवलेली अशी कोणत्याही प्रकारची भांडी वापरू शकता. इंडक्शनवर मात्र त्यासाठी बनवल्या गेलेल्या विशेष भांड्यांचाच वापर करावा लागतो. ही भांडी बऱ्याचदा खूप महागही असतात.
advertisement
4/9
सुरक्षेचा विचार केला तर इंडक्शन चांगलं आहे. कारण त्याचा पृष्ठभाग किंवा बेस गरम होत नाही, ज्यामुळे तुम्हाला भाजण्याचा किंवा चटका लागण्याचा धोका कमी होतो. याउलट इन्फ्रारेडचा बेस स्वयंपाक केल्यानंतर बराच वेळ गरम राहतो. चुकून कोणाचाही त्याला हात लागल्यास भाजण्याची शक्यता असते.
advertisement
5/9
मात्र इन्फ्रारेड कूकटॉपचा एक फायदा आहे. तो म्हणजे यात असलेले अचूक तापमान नियंत्रण आणि 'वॉर्म' मोड भारतीय स्वयंपाकासाठी चांगले आहेत. कारण यावर चपात्या व्यवस्थित भाजल्या जातात आणि ग्रिलिंगदेखील हे खूप चांगलं करतात. या गोष्टी इंडक्शनमध्ये करता येत नाही. इंडक्शनवर चपाती फुगवणं शक्य होत नाही.
advertisement
6/9
विजेच्या वापराच्या बाबतीत बोलायचं झालं, तर इन्फ्रारेड कुकटॉप्स भांड्यांना सुमारे 70-75% ऊर्जा देतात. कारण हे कूकटॉप्स आधी त्यांच्या काचेच्या बेसला गरम करतात आणि नंतर भांड्यांना. याउलट इंडक्शनचं असतं.
advertisement
7/9
इंडक्शन कुकटॉप्स सुमारे 90% ऊर्जा थेट भांड्यांना देतात. इंडक्शनवर अन्न 25% वेगाने शिजतं. यामुळं त्यांना कमी वीज लागते. वीजबिल वाचवण्याचा विचार करत असाल तर इंडक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे.
advertisement
8/9
या दोन्हींचे काही फायदे तर काही तोटे आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यातील योग्य पर्याय निवडू शकता. वीज वाचवणे आणि स्वयंपाक लवकर बनायला हवा असेल तर इंडक्शन चांगला पर्याय ते. मात्र मातीची भांडी किंवा तुमच्याकडे असलेलीच भांडी वापरून स्वयंपाक कार्याचा असेल तर इन्फ्रारेड कूकटॉप तुम्ही निवडू शकता.
advertisement
9/9
या दोन्हींचे काही फायदे तर काही तोटे आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही यातील योग्य पर्याय निवडू शकता. वीज वाचवणे आणि स्वयंपाक लवकर बनायला हवा असेल तर इंडक्शन चांगला पर्याय ते. मात्र मातीची भांडी किंवा तुमच्याकडे असलेलीच भांडी वापरून स्वयंपाक कार्याचा असेल तर इन्फ्रारेड कूकटॉप तुम्ही निवडू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Induction Vs Infrared : इंडक्शन की इन्फ्रारेड, कोणतं कूकटॉप तुमच्यासाठी आहे चांगलं? कशाला लागते कमी वीज?