TRENDING:

Women's Day History : जागतिक महिला दिन 8 मार्चलाच का साजरा करतात? तुम्हाला 'हे' कारण माहित नसेल..

Last Updated:
दरवर्षी 8 मार्चला International Women's Day म्हणजेच जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या वर्षी तो रविवारी साजरा केला जाईल. महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर होत आहेत, आता महिलांना सामाजात महत्त्वाचं स्थान मिळत आहे आहे. मात्र पूर्वीच्या काळी असं नव्हतं. म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे. चला जाणून घेऊया जागतिक महिला दिनका साजरा केला जातो.
advertisement
1/7
जागतिक महिला दिन 8 मार्चलाच का साजरा करतात? तुम्हाला 'हे' कारण माहित नसेल..
'जागतिक महिला दिन' हा काम, शिक्षण, राजकारण आणि संस्कृतीसह जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये महिला आणि मुलींच्या कामगिरीची ओळख आणि प्रशंसा करण्याचा दिवस आहे. महिलांच्या समान हक्क आणि न्याय्य संधींच्या गरजेबद्दल बोलण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.
advertisement
2/7
गेल्या काही वर्षांत हा दिवस केवळ सेलेब्रशांसाठी नव्हे तर चळवळीसाठीही ओळखला जाऊ लागला आहे. या दिवसाच्या निमित्ताने हे अधोरेखित केलं जातं महिलांची प्रगती झाली असली तरी अजूनही खूप काम बाकी आहे. अनेक गट या दिवसाचा वापर बदलासाठी आणि त्यांच्या समुदायातील महिलांना पाठिंबा देण्यासाठी करतात.
advertisement
3/7
महिला दिनाला प्रत्येक महिला वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करते. मात्र आपला प्रश्न हा आहे की, महिला दिन 8 मार्चलाच का साजरा केला जातो. या दिवशी असं काय झालं होतं? चला पाहूया.
advertisement
4/7
आंतरराष्ट्रीय महिला दिन 1900 च्या दशकाच्या सुरुवातीपासून साजरा केला जात आहे. त्यावेळी अनेक महिला गरीब परिस्थितीत कमी पगारावर जास्त तास काम करायच्या. एका काळानंतर त्यांनी निषेध करण्यास सुरुवात केली आणि कमी कामाचे तास, योग्य वेतन आणि मतदानाचा अधिकार यासह चांगल्या उपचारांची मागणी केली.
advertisement
5/7
राष्ट्रीय महिला दिनाची स्थापना प्रथम 1910 मध्ये अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने केली. त्यानंतर लवकरच ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांनीही 1911 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
advertisement
6/7
संयुक्त राष्ट्रांनी (UN) 1975 मध्ये अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय महिला दिनाला मान्यता दिली. 1977 मध्ये महिला हक्क आणि आंतरराष्ट्रीय शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी 8 मार्च हा दिवस स्वीकारण्यात आला. तेव्हापासून हा दिवस एक जागतिक कार्यक्रम बनला आहे.
advertisement
7/7
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना समान वेतन, शिक्षण, सुरक्षितता मिळावी आणि महिलांवरील हिंसाचार संपवणे यासारख्या मुद्द्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात येते. ज्यां महिलांनी त्यांच्या कुटुंबात, कामाच्या ठिकाणी आणि समुदायात बदल घडवून आणला आहे, त्यांच्या सन्मानासाठीही हा दिवस साजरा केला जातो. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Women's Day History : जागतिक महिला दिन 8 मार्चलाच का साजरा करतात? तुम्हाला 'हे' कारण माहित नसेल..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल