TRENDING:

सावधान! तुमच्या प्लेटमधील 'हे' पदार्थ वाढवतायत ब्लड प्रेशर; 'या' चुका टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Last Updated:
आजकाल उच्च रक्तदाब ही एक मोठी समस्या बनली आहे, ज्याने ग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. सामान्य रक्तदाब 110-120/70-90 mmHg असतो. खाणे, धावणे, व्यायाम आणि...
advertisement
1/6
तुमच्या प्लेटमधील 'हे' पदार्थ वाढवतायत ब्लड प्रेशर; 'या' चुका टाळा, अन्यथा...
आजकाल बहुतांश लोकांना उच्च रक्तदाबाची म्हणजेच हाय ब्लड प्रेशरची समस्या भेडसावत आहे. दिवसेंदिवस या त्रासाने ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या वाढताना दिसते. सामान्यतः माणसाचा रक्तदाब 110-120/70-90 mmHg इतका असतो. यापेक्षा अधिक झाल्यास तो उच्च रक्तदाब मानला जातो. माणसाच्या शरीरात रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होण्यासाठी रक्तदाब हा महत्त्वाचा घटक असतो.
advertisement
2/6
साधारणतः जेवल्यानंतर, धावल्यावर, व्यायाम केल्यानंतर किंवा झोप कमी झाल्यास रक्तदाब काहीसा वाढतोच. काही लोकांमध्ये उच्च रक्तदाब अनुवंशिक असतो, पण बहुतांश प्रकरणांमध्ये तो आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे होतो.
advertisement
3/6
या संदर्भात डॉ. प्रांजल चेटिया यांनी माहिती दिली की, गहू, बटर, वनस्पती तूप, मांस, अंडी यांसारख्या अति प्रमाणात प्रथिने आणि सॅच्युरेटेड फॅट्स असलेल्या गोष्टी खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाब होतो. या प्रकारच्या आहारामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि त्यामुळे नसांमध्ये आणि धमन्यांमध्ये चरबी साचते.
advertisement
4/6
बरेच लोक मीठाचा वापरही जास्त करतात. परंतु जास्त मीठ खाणं शरीरासाठी घातक असतं. प्रतिदिन फक्त 5 ग्रॅम मीठ खाणं योग्य मानलं जातं. त्यापेक्षा जास्त मीठ घेतल्यास रक्त जास्त चिकट होतं आणि त्यामुळे रक्तदाब वाढतो.
advertisement
5/6
तसंच, जे लोक मद्यपान अधिक करतात त्यांच्यातही उच्च रक्तदाब आढळतो. हृदयाच्या आजारांनी ग्रस्त लोकांनाही रक्तदाबाची समस्या असते. पण याशिवाय मानसिक तणाव आणि चिंता हाही यामागचा सर्वात मोठा कारणीभूत घटक आहे. सततच्या मनस्तापामुळे आणि मानसिक अस्वस्थतेमुळे रक्तदाब वाढतो.
advertisement
6/6
पुरुषांमध्ये ही समस्या महिलांच्या तुलनेत अधिक आढळते. विशेषतः वयाच्या चाळिशीनंतर ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. म्हणूनच, आपल्या दैनंदिन सवयी, खाण्यापिण्याची पद्धत, मानसिक आरोग्य आणि झोप या गोष्टींची योग्य काळजी घेतल्यास उच्च रक्तदाब टाळता येऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
सावधान! तुमच्या प्लेटमधील 'हे' पदार्थ वाढवतायत ब्लड प्रेशर; 'या' चुका टाळा, अन्यथा होतील गंभीर परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल