Kidney Cancer : किडनीच्या कॅन्सरपूर्वी शरीरात दिसतात ही लक्षणं, अजिबात करु नका Ignore, उशीर झाला तर पश्चातापाची येईल वेळ
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सध्याच्या काळात बदललेली जीवनशैली आणि प्रदूषणामुळे किडनीच्या कॅन्सरचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. किडनी शरीराच्या आतल्या भागात असते, त्यामुळे तिथे गाठ किंवा ट्यूमर झाला तरी तो सुरुवातीला जाणवत नाही. म्हणूनच किडनीच्या कॅन्सरला 'सायलेंट किलर' मानले जाते.
advertisement
1/10

आपल्या शरीरात दोन लहान अवयव 24 तास अहोरात्र काम करत असतात. ते म्हणजे आपली किडनी. रक्ताचे शुद्धीकरण करणे आणि विषारी घटक शरीराबाहेर टाकणे ही महत्त्वाची जबाबदारी त्या पार पाडतात. पण, दुर्दैवाने किडनीच्या आरोग्याकडे आपण वेळेवर लक्ष दिलं नाही तर मात्र त्याचा जास्तच त्रास होऊन बसतो.
advertisement
2/10
सध्याच्या काळात बदललेली जीवनशैली आणि प्रदूषणामुळे किडनीच्या कॅन्सरचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. किडनी शरीराच्या आतल्या भागात असते, त्यामुळे तिथे गाठ किंवा ट्यूमर झाला तरी तो सुरुवातीला जाणवत नाही. म्हणूनच किडनीच्या कॅन्सरला 'सायलेंट किलर' मानले जाते. पण, जर आपण शरीराने दिलेल्या काही छोट्या संकेतांकडे वेळीच लक्ष दिले, तर या आजारातून 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. नक्की कोणती आहेत ही लक्षणे? चला, विज्ञानाच्या आधारे जाणून घेऊया.
advertisement
3/10
लघवीवाटे येणारे रक्त 'फॉक्स चेस युनिव्हर्सिटी'चे मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. डेव्हिड चेन यांच्या मते, लघवीचा रंग अचानक बदलणे किंवा लघवीतून रक्त येणे हे किडनी कॅन्सरचे सर्वात मोठे लक्षण आहे. अनेकदा यात वेदना होत नाहीत, त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण जर विनाकारण लघवी लालसर किंवा गडद रंगाची होत असेल, तर त्वरित तपासणी करणे गरजेचे आहे.
advertisement
4/10
कंबर आणि पाठीचा तीव्र त्रासजर तुमच्या पाठीच्या खालच्या भागात किंवा कंबरेच्या एका बाजूला सतत दुखत असेल, तर ती साधी 'बॅक पेन' नसू शकते. ट्यूमरचा आकार वाढल्यामुळे आजूबाजूच्या स्नायूंवर दाब पडतो, ज्यामुळे असह्य वेदना होतात. काही रुग्णांना पोटाच्या बाजूला किंवा हाताला स्पर्श केल्यावर एखादी गाठ जाणवू शकते.
advertisement
5/10
अचानक वजन घटणे आणि प्रचंड थकवाकोणताही डाएट किंवा व्यायाम न करता जर तुमचे वजन वेगाने कमी होत असेल, तर सावध व्हा. कॅन्सरच्या पेशी शरीरातील ऊर्जा वेगाने वापरतात, ज्यामुळे भूक मंदावते आणि सतत थकवा जाणवतो. पुरेशी विश्रांती घेऊनही जर तुम्हाला मरगळ वाटत असेल, तर हे किडनी निकामी होण्याचे किंवा कॅन्सरचे लक्षण असू शकते.
advertisement
6/10
न उतरणारा ताप आणि रात्रीचा घामकोणतेही इन्फेक्शन नसतानाही जर तुम्हाला सतत ताप येत असेल, रात्री झोपेत घाम येत असेल किंवा खूप उष्णता जाणवत असेल, तर शरीर कॅन्सर पेशींशी लढत असल्याचे हे संकेत असू शकतात. तसेच शरीरात रक्ताची कमतरता (Anemia) जाणवणे हे देखील किडनीच्या बिघडलेल्या कार्याचे लक्षण आहे.
advertisement
7/10
कोणाला आहे सर्वाधिक धोका?ज्यांच्या कुटुंबात किडनी कॅन्सरचा इतिहास आहे.ज्यांनी किडनी प्रत्यारोपण (Transplant) केले आहे.किडनीच्या जुन्या आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण.धूम्रपान करणारे आणि उच्च रक्तदाब असलेले व्यक्ती.
advertisement
8/10
घाबरू नका, आधुनिक उपचार उपलब्ध आहेतआज वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाली आहे. आता कॅन्सर झाला म्हणजे पूर्ण किडनी काढावी लागतेच असे नाही. रोबोटिक सर्जरीद्वारे केवळ कॅन्सरग्रस्त भाग काढला जातो आणि उरलेली किडनी सुरक्षित राहते. औषधांच्या माध्यमातून शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून कॅन्सर पेशींचा नाश केला जातो. अत्यंत लहान ट्यूमर गोठवून (Freeze) नष्ट करण्याची क्रायो अ‍ॅब्लेशन ही पद्धत सध्या लोकप्रिय होत आहे.
advertisement
9/10
किडनी कॅन्सर हा जीवघेणा असला तरी 'लवकर निदान' हीच त्याची गुरुकिल्ली आहे. भरपूर पाणी पिणे, तंबाखू-धूम्रपान टाळणे आणि नियमित व्यायाम करणे यामुळे आपण आपली किडनी सुरक्षित ठेवू शकतो. शरीरात कोणताही असामान्य बदल दिसल्यास अफवांवर विश्वास न ठेवता तज्ज्ञ यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या.
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kidney Cancer : किडनीच्या कॅन्सरपूर्वी शरीरात दिसतात ही लक्षणं, अजिबात करु नका Ignore, उशीर झाला तर पश्चातापाची येईल वेळ