Kitchen Jugaad: पिठामध्ये फिरवा या गोष्टी, किड्यांचे जगणे होईल मुश्किल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
साठवलेल्या पीठात दिसणाऱ्या या लहान किटकांमुळे महिलावर्ग खूपच हैराण आहे. आज आपण पीठातील हे लहानसे किडे घालवण्यासाठीच्या काही सोप्या युक्त्या जाणून घेणार आहोत.
advertisement
1/9

भारतीय स्वयंपाक घरांमध्ये आपल्याला अनेक गोष्टी साठवून ठेवलेल्या पाहायला मिळतील. याचा फायदा असा की गरजेच्या वेळी या गोष्टी सहज उपलब्ध होतील. स्वयंपाकघरात नेहमीच दिसणारी आणखी एक गोष्ट म्हणजे पीठ.
advertisement
2/9
तांदूळ, डाळी यांच्याप्रमाणेच पीठही आपण साठवून ठेवतो. यापासून दैनंदिन आहारात लागणाऱ्या पोळ्या, पराठे, भाकऱ्या बनवता येतात. मात्र अनेकदा या साठवलेल्या पीठात किडे दिसतात. त्यांना काही ठिकाणी टोके असंही म्हणतात.
advertisement
3/9
या लहान दिसणाऱ्या किटकांमुळे महिलावर्ग खूपच हैराण आहे. आज आपण पीठातील हे लहानशे किडे घालवण्यासाठीच्या काही सोप्या युक्त्या जाणून घेणार आहोत.
advertisement
4/9
पिठात किडे होण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यातील मुख्य कारण म्हणजे हवामानातील बदल. पिठात पडलेल्या या लहान किड्यांमुळे संपूर्ण पीठ खराब होऊन ते बाहेर फेकून द्यावे लागू शकते.
advertisement
5/9
आज आम्ही तुमच्यासाठी काही अतिशय सोप्या युक्त्या घेऊन आलो आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही पीठातील किडे सहज घालवू शकता.
advertisement
6/9
तमालपत्राचा वापर पिठातील कीटक काढून टाकण्यासाठी केला जाऊ शकतो. पिठात तमालपत्र टाकून ठेवल्याने हे किडे पळून जातील आणि पुन्हा येणार नाहीत.
advertisement
7/9
पीठ मळताना तर आपण त्यामध्ये मीठ घालतोच. मात्र साठवलेल्या पिठातही थोडे मीठ घाला. यामुळे किडे पिठापासून दूर राहतील आणि पीठ खराब होणार नाही.
advertisement
8/9
पिठाच्या डब्यात कोरडी लाल मिरची ठेवल्यास देखील पिठात किडे होणार नाहीत.
advertisement
9/9
पीठ साठवण्यासाठी चुकीचे कंटेनर वापरल्यास त्यामध्ये किडे होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे असे कंटेनर निवडा ज्याचे झाकण पूर्णपणे बंद होईल. या डब्यात कोणत्याही प्रकारची छिद्रे नसावीत. शिवाय डब्यातून पीठ काढल्यानंतर डबा व्यवस्थित बंद करावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Jugaad: पिठामध्ये फिरवा या गोष्टी, किड्यांचे जगणे होईल मुश्किल