Kitchen Tips : या सोप्या ट्रिक्स वापरून काही मिनिटांत सोला किलोभर लसूण! हातानांही होणार नाही त्रास
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
लसूण सोलायचा म्हणल्यावर खूप लोकांना टेन्शन येते. कारण लसूण सोलायचा म्हणजे त्याची साल नखांनी ओढून काढावी लागते. यामुळे नखं मात्र खराब होतात. त्यातही लसूण खूप जात असेल तर नखांना खूप वेदना होतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही युक्त्या सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही काही मिनिटात खूप सारा लसूण सोलू शकता.
advertisement
1/6

मायक्रोवेव्हचा वापर करा : जास्त लसूण एकदम सोलण्यासाठी लसूण २० ते ३० सेकंद ओव्हनमध्ये गरम करा आणि त्यानंतर आपल्या हातांनी थोडासा चोळून घ्या. लसणाची साल सहज निघेल.
advertisement
2/6
डबा वापरा : लसूण एखाद्या डब्यात किंवा बॉटलमध्ये घ्या. आता डबा बंद करून चांगला हलवा. यामुळे तुम्हाला <a href="https://lokmat.news18.com/photogallery/lifestyle/benefits-of-keeping-garlic-under-pillow-while-sleeping-garlic-benefits-mhpj-915257.html">लसणाची साल</a> सैल झालेली दिसेल. आता हाताने चोळल्यानंतर सर्व साल निघून जाईल.
advertisement
3/6
लसूण गरम करा : एका कढईमधे लसूण टाकून गरम करा आणि त्यात तो भाजून घ्या. थोडा भाजल्यानंतर लसणाची साल सैल होईल. आता ती हाताने चोळा म्हणजे सहज निघून जाईल.
advertisement
4/6
चाकूचा वापर करा : मोठ्या चाकूने <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/kitchen-tips-peel-kilos-of-garlic-in-few-minutes-by-using-these-simple-tricks-mhpj-1188640.html">लसूण</a> थोडा दाबा. लसणाच्या टोकावर दाब दिल्याने त्याची निघास मदत होते. प्रथम लसणाचा वरचा भाग सोलून घ्या. त्यानंतर बाकीची सालही सहज निघते. परंतु ही पद्धत खूप वेळ घेणारी आहे.
advertisement
5/6
लसूण भिजवा : लसूण तासभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर, पाण्यात हाताने लसूण चोळून घ्या. अशापद्धतीने सर्व साल सहज निघेल.
advertisement
6/6
सिलिकॉन पीलर वापरा : लसूण डोळ्यांसाठी बाजारात सिलिकॉन लसूण पीलर ट्यूब मिळतात. यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या घाला आणि त्याला खाली ठेऊन रगडा. यामुळे लसणाची साल सहज निघते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : या सोप्या ट्रिक्स वापरून काही मिनिटांत सोला किलोभर लसूण! हातानांही होणार नाही त्रास