Amla Health Benefits: गुणकारी आवळ्याचे आहेत इतके फायदे सहज दूर होतील गंभीर आजार
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Amla Health Benefits in Marathi: आवळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि इतर अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला आतून बळकट करतात. आवळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होतेच त्याचसोबत डायबिटीस आणि हार्ट ॲटॅक सारख्या आजारांनाही दूर ठेवता येतं.
advertisement
1/7

दररोज आवळा खाल्ल्याने किंवा आवळ्याचा रस प्यायल्याने त्वचा निरोगी राहायला मदत होते. यामुळे मुरुमांची समस्या सुद्धा कमी होते.
advertisement
2/7
आवळ्यात असलेल्या कॅरोटीनमुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारायला मदत होते. दररोज आवळा खाल्ल्याने दृष्टीदोष, मोतीबिंदू सारख्या आजारांना दूर ठेवता येतं.
advertisement
3/7
अनेक आवळ्याचा रस असलेल्या केशतेलाच्या अनेक जाहिराती आपण पाहिल्या आहेत. आवळ्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि त्यांची वाढ चांगली होते. केस गळतीचा त्रास असलेल्या लोकांसाठी आवळ्याचा रस गुणकारी आहे.
advertisement
4/7
आवळ्याचे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे शरीरात इन्सुलिनची तयार होण्याचं प्रमाण वाढतं. याशिवाय आवळ्यामध्ये असलेलं क्रोमियम हे शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व आहे जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे दररोज आवळा खाल्ल्याने डायबिटीस नियंत्रणात येतो.
advertisement
5/7
उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आवळा मदत करतो. नियमितपणे आवळा खाल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाणं हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
6/7
आवळा हा जीवनसत्व सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे शरीराला संसर्गाविरूद्ध लढण्यास मदत करतो. दररोज सकाळी रिकाम्यापोटी आवळा खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते ज्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होऊ शकतं.
advertisement
7/7
आवळ्यात असलेल्या फायबर्समुळे पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेस सारख्या आजारांना दूर ठेवता येऊ शकतं. दररोज रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर पचनाच्या अनेक समस्यांपासून टाळता येऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Amla Health Benefits: गुणकारी आवळ्याचे आहेत इतके फायदे सहज दूर होतील गंभीर आजार