TRENDING:

Winter special soups: हिवाळ्यात रमऐवजी प्या हे गरमागरम सूप! मिळेल ताकद, राहाल निरोगी

Last Updated:
Winter special soups: हिवाळ्यात थंडीचा कडाका वाढला अनेकजणांचा मोर्चा रमकडे वळतो. पण त्यांचं काय जे मद्यमान करत नाहीत.आज अशा व्यक्तीसाठी घेऊन आलोत हिवाळ्यातल्या स्पेशल सूपची माहिती. हे सूप पिण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाहीये. तुम्ही घरच्या घरीच हे चवदार सूप बनवू शकता.
advertisement
1/7
Winter special soups हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी प्या हे सूप
थंडीत सुकामेवा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. याशिवाय बदामांमध्ये असलेले मोनोसॅच्युरेटेट फॅट्स रक्तातल्या कोलेस्टेरॉलची वाढ रोखतात. त्यामुळे बदाम सूप फक्त चवीलाच नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायद्याचं आहे.
advertisement
2/7
स्वीटकॉर्न सूप आपण सगळेचं बाहेर पितो. मुळा हा तब्येतीसाठी फायदेशीर आहे. मात्र तो चवीला कडू असल्याने मुळा आणि स्वीटकॉर्न सूप एकत्र पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे सूपची चव तर वाढतेच मात्र मका आणि मुळा या दोन्हीची पोषकतत्वे एकाच वेळी शरीरात जातात.
advertisement
3/7
हिवाळ्यात गाजर मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे गाजराचं सूप नक्की करून प्या. गाजर उकडून घ्या. नंतर ते थोडं आलं टाकून मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर ते गाळून घ्या आणि त्यात गरजेनुसार पाणी टाका.
advertisement
4/7
मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. मेथीतल्या अँन्टिऑक्सिडंटमुळे कर्करोग, मधुमेह व उच्च रक्तदाब यांना प्रतिबंध होण्यास मदत होतो, त्यामुळे मेथीचं सूप हे आरोग्यसाठी फार महत्वाचं ठरतं.
advertisement
5/7
हिवाळ्यात पालक मुबलक प्रमाणात आणि चांगलं मिळतं. त्यामुळे पालक भाजी, पालक पराठे, पालक पुरी यापेक्षा हिवाळ्यात पालक सूप करण्यास प्राधान्य द्या. पालकाच्या सूपमध्ये बटाटा, टोमॅटो आणि लसूण टाकल्यास त्याची चव आणखीन वाढेल.
advertisement
6/7
मुगाच्या डाळीचं सूप अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकं असतं. हिवाळ्यात थोड्याशा भाज्या घालून मुगाच्या डाळीचं सूप प्यावं. लसूण आणि आलं सूपची चव आणखी वाढवतील.
advertisement
7/7
बीट किंवा बीट हा प्रथिने, फोलेट, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांचा उत्कृष्ट स्रोत आहे.त्यामुळे थंडीत बीटरूटचा सूप प्रचंड आरोग्यदायी ठरतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Winter special soups: हिवाळ्यात रमऐवजी प्या हे गरमागरम सूप! मिळेल ताकद, राहाल निरोगी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल