'मी मरणाच्या दारात असताना...', घराबाहेर करणाऱ्या 'बिग बॉस'वर दिव्या शिंदेचे धक्कादायक आरोप, पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Divya Shinde Controversy: आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिव्याने जे खुलासे केले, ते ऐकून रिअॅलिटी शोच्या झगमगाटामागील काळं वास्तव समोर आलं आहे. तिने थेट 'बिग बॉस'च्या मेकरवरच प्रश्नांची तोफ डागली आहे.
advertisement
1/9

मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातून अनपेक्षितपणे बाहेर पडलेली दिव्या शिंदे सध्या शांत बसायच्या मूडमध्ये नाहीये. "बाहेर गेल्यावर तलवार चालवेन" या एका विधानामुळे तिला शोमधून हाकलण्यात आलं, पण आता तिने थेट 'बिग बॉस'च्या मेकरवरच प्रश्नांची तोफ डागली आहे.
advertisement
2/9
आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दिव्याने जे खुलासे केले, ते ऐकून रिअ‍ॅलिटी शोच्या झगमगाटामागील काळं वास्तव समोर आलं आहे. "मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवून बाहेर काढलं, पण मी आजारी असताना मला मरणाच्या दारात सोडलं होतं," असा खळबळजनक आरोप दिव्याने केला आहे.
advertisement
3/9
दिव्या सांगते की, बिग बॉसमध्ये येण्यापूर्वीच तिने तिच्या आरोग्याबद्दल टीमला स्पष्ट कल्पना दिली होती. ती म्हणाली, "माझं सिलेक्शन होताना मी अटी घातल्या होत्या की माझी तब्येत ठीक नसते, मला आरामाची गरज लागेल. त्यांनी 'ताई आम्ही काळजी घेऊ' असं आश्वासन दिलं. पण प्रत्यक्षात मात्र उलट घडलं."
advertisement
4/9
दिव्याने पुढे सांगितलं, "घरात माझा ऑक्सिजन लेव्हल कमी होत होती, मी वेदनेने रडत होते, पण मला हवं असलेलं इंजेक्शन द्यायला त्यांनी दोन दिवस लावले. मी तिथे अक्षरशः मरणाच्या दारात उभी होते."
advertisement
5/9
दिव्या शिंदेने केवळ आजारपणावरच नाही, तर शोच्या एडिटिंगवरही मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या मते, तिला मुद्दाम व्हिलन ठरवण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रसंग कापले गेले.
advertisement
6/9
"मी स्वतःहून कन्फेशन रूममध्ये जाऊन सांगितलं होतं की मला हा शो सोडायचा आहे. तिथे माझा मान-सन्मान दुखावला जातोय आणि मला कोणाच्या अटीवर खेळायचं नाहीये. पण त्यांनी हे फुटेज कधीच दाखवलं नाही," असं दिव्या म्हणाली.
advertisement
7/9
तलवारीच्या विधानाबद्दल ती म्हणाली, "प्राजक्ता शुक्रेने मला सुचवलं होतं की तू 'शब्दांची तलवार' असा उल्लेख कर. मी तिला म्हटलं होतं की माझ्या मनात तेच आहे, मी तेच बोलणार आहे. पण बिग बॉसने हे बोलणंही प्रेक्षकांपासून लपवून ठेवलं."
advertisement
8/9
दिव्याला कन्फेशन रूममध्ये बोलवून घेण्याआधी राकेश बापट, ओमकार राऊत आणि करण सोनावणे यांनी तिची बाजू समजून घेतली होती. पण त्यांनी ते फुटेज दाखवलं नाही असा दिव्याने दावा केला.
advertisement
9/9
राकेशने तर बिग बॉसला समजावण्याचा प्रयत्नही केला होता की दिव्याची मनस्थिती काय आहे. मात्र, निर्मात्यांनी कोणाचंही न ऐकता केवळ 'धमकी' या एका मुद्द्यावर तिला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी मरणाच्या दारात असताना...', घराबाहेर करणाऱ्या 'बिग बॉस'वर दिव्या शिंदेचे धक्कादायक आरोप, पत्रकार परिषदेत सगळंच सांगितलं