TRENDING:

Knowledge : ताटाऐवजी केळीच्या पानावरच का जेवतात साऊथ इंडियन?

Last Updated:
भारतात अनेक शतकांपासून जेवण वाढण्यासाठी केळीची पानं वापरली जात आहेत. जर तुम्ही दक्षिण भारतात गेलात तर तुम्हाला तिथे जवळपास सर्वच घरांमध्ये या पानांचा वापर जेवण वाढण्यासाठी होताना दिसेल.
advertisement
1/7
Knowledge : ताटाऐवजी केळीच्या पानावरच का जेवतात साऊथ इंडियन?
भारतात अनेक शतकांपासून जेवण वाढण्यासाठी केळीची पानं वापरली जात आहेत. जर तुम्ही दक्षिण भारतात गेलात तर तुम्हाला तिथे जवळपास सर्वच घरांमध्ये या पानांचा वापर जेवण वाढण्यासाठी होताना दिसेल.
advertisement
2/7
केळीची पानं पवित्र आणि शुद्ध मानली जातात आणि म्हणूनच देवांना केळीच्या पानांमध्ये नैवेद्य दाखवला जातो. दक्षिण भारतात, लोक आजही खास प्रसंगी आणि सण असतील तर पाहुण्यांना केळीच्या पानांवर जेवण वाढतात.
advertisement
3/7
या पानांमध्ये पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असतं, जे ग्रीन टी आणि इतर काही पालेभाज्यांमध्येही आढळतं. ही पानं मोठी असल्याने यात जेवण वाढणं सोपं पडतं. या पानांवर निसर्गतःच मेणासारखा थर असते त्यामुळे ते स्वच्छ करायला बरे पडतात. या पानांमुळे जेवणाची चव वाढते.
advertisement
4/7
केळीची पानं खूप स्वस्त असतात, त्यासाठी जगातील इतर कोणत्याही सर्व्हिंग प्लेटपेक्षा खर्च कमी येतो. ते घाऊक दरात विकली जातात. या पानांच्या किमती त्याच्या ठिकाणांनुसार बदलतात.
advertisement
5/7
या पानांमध्ये पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असते, जे ग्रीन टी आणि इतर काही पालेभाज्यांमध्येही आढळते. असे अँटिऑक्सिडंट वृद्धत्व, लाइफस्टाइल संबंधित समस्या आणि कॅन्सर टाळण्यास मदत करतात.
advertisement
6/7
केळीच्या पानांवर लोक द्रवपदार्थही खातात, कारण ही पानं नैसर्गिक मेणासारख्या थरामुळे वॉटरप्रूफ असतात. ही पानं मेणासारखी असतात, त्यामुळे त्यावर धूळ बसत नाही आणि स्वच्छ करायला सोपे आहेत. ते धुवून लगेच तुम्ही वापरू शकता. म्हणून दक्षिण भारतातील रेस्टॉरंट्स जेवण वाढण्यासाठी केळीच्या पानांचा वापर करतात.
advertisement
7/7
ही पाने इतर कोणत्याही झाडाच्या पानांपेक्षा मोठी असतात. त्यामुळे ती वेगवेगळ्या आकारात कापून कोणत्याही प्लेटमध्ये ठेवता येतात. केळीची पानं खूप मोठी असतात आणि एका तुकड्यात संपूर्ण जेवण वाढता येते. सगळे पदार्थ वेगवेगळे वाढले तरी त्या पानात मावतं. त्यामुळे केळीची पानं प्लेट म्हणून वापरली जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Knowledge : ताटाऐवजी केळीच्या पानावरच का जेवतात साऊथ इंडियन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल