फॅशनसाठी बेस्ट कोरिअन बॅग, खरेदी करा मुंबईतील प्रसिद्ध मार्केमध्ये 300 रुपयात, PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
कोरियन बॅग इथे तुम्हाला 300 रुपयांपासून मिळून जातील. मुलींसाठी खास वन साईडेड वेगवेगळ्या प्रकारचे कोरियन झोला फक्त 500 रुपयांमध्ये मिळतात.
advertisement
1/7

शॉपिंग म्हटलं की अनेकांना मुंबईच आठवते. मुंबईत अनेक प्रसिद्ध मार्केट आहेत. तिथं अगदी स्वस्तात पाहिजे त्या वस्तू मिळतात. मुंबईतील असंच एक प्रसिद्ध मार्केट म्हणजे फॅशन स्ट्रीट होय. इथं जवळपास 500 पेक्षा अधिक दुकानांच्या रांगाच दिसतात.
advertisement
2/7
लहान मुलांपासून अगदी मोठ्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे वेस्टर्न स्टाईलचे कपडे, बॅग, शूज, बेल्ट, घड्याळ, चष्मा अशा सगळ्या वस्तू इथं अगदी 100 ते 200 रुपयांपासून मिळतात. याच फॅशन स्ट्रीटवर आकर्षक आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग देखील अगदी होलसेल दरात मिळतात. याबाबतच आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
3/7
चर्चेगेट रेल्वे स्थानकावर उतरल्यावर अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर तुम्हाला फॅशन स्ट्रीट मार्केट दिसते. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकात आलात तरी देखील तुम्ही अगदी 10 मिनिटात फॅशन स्ट्रीट मार्केटला पोहोचू शकता. म्हणजे दोन्हीही रेल्वे स्थानकांपासून तुम्हाला हे मार्केट अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आहे.
advertisement
4/7
फॅशन स्ट्रीटमध्ये दुकान क्रमांक 77 मध्ये तुम्हाला एकापेक्षा एक भारी कोरियन पद्धतीच्या बॅग कमी दरात विकत मिळतील. जर मुलांना वन साईड बॅग घ्यायचा असेल तर त्या तुम्हाला इथे फक्त 150 रुपयांमध्ये मिळतात.
advertisement
5/7
एवढंच नव्हे तर चक्क कोरियन बॅग इथे तुम्हाला 300 रुपयांपासून मिळून जातील. मुलींसाठी खास वन साईडेड वेगवेगळ्या प्रकारचे कोरियन झोला फक्त 500 रुपयांमध्ये मिळतात. हे झोला सध्याच्या घडीला खूप ट्रेंडिंग असून कॉलेजच्या मुली किंवा बेसिक युजसाठी हमखास वापरली जाते.
advertisement
6/7
हिमालय प्रदेशात वापरल्या जाणार हेम्प बॅग या सध्या सर्वत्र प्रसिद्ध आहेत. या बॅग तुम्हाला इतर ठिकाणी 400 ते 500 रुपयांमध्ये मिळून जातील, मात्र या दुकानात त्या बॅग फक्त तुम्हाला फक्त 350 रुपयांमध्ये मिळून जातील. या बॅगमध्ये तुम्हाला 20 पेक्षा जास्त प्रकार आणि रंग विकत मिळून जातील. एवढेच नव्हे तर वन साईड बॅग तुम्हाला फक्त 200 रुपयांमध्ये या ठिकाणी मिळून जातील.
advertisement
7/7
महिलांना ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी किंवा प्रेझेंटेशनसाठी ऑफिस लुकच्या अशा वन साईटेड ऑफ व्हाईट आणि ब्राऊन रंगाच्या बॅग नेहमीच पहिला पर्याय असतात. या बॅग तुम्हाला या ठिकाणी फक्त 500 रुपयांमध्ये विकत मिळते. जर तुम्हाला सुध्दा स्टाईलिश आणि युनिक बॅग घ्यायच्या असतील तर या मार्केटला नक्की भेट द्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
फॅशनसाठी बेस्ट कोरिअन बॅग, खरेदी करा मुंबईतील प्रसिद्ध मार्केमध्ये 300 रुपयात, PHOTOS