TRENDING:

Realme चा भारी फोन 12 हजार रुपयांनी झाला स्वस्त! अ‍ॅमेझॉनवर मोठा इलेक्ट्रॉनिक सेल

Last Updated:
अॅमेझॉन इलेक्ट्रॉनिक्स प्रीमियर लीग 2026 सेलमध्ये रियलमी GT 7 प्रोवर मोठं डिस्काउंट मिळतंय. स्नॅपड्रॅगन 8 एलाइट, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंगचा हा फ्लॅगशिप फोन आता 48,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे.
advertisement
1/7
Realmeचा भारी फोन 12 हजार रुपयांनी झाला स्वस्त! अ‍ॅमेझॉनवर मोठा इलेक्ट्रॉनिक सेल
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर सुरु असलेल्या अॅमेझॉन इलेक्ट्रॉनिक्स प्रीमियर लीग 2026 सेल दरम्यान अनेक इसेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर शानदार ऑफर मिळत आहेत. या सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट, एसी, फ्रिज आणि ऑडिओ डिव्हाइसवर मोठं डिस्काउंट दिलं जात आहे. या सर्वांमध्ये रियलमी GT 7 प्रोवर मिळत असलेली ऑफर खुप चर्चते आहे. कारण हा फोन आता 48,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
advertisement
2/7
Amazon वर Realme GT 7 Pro ची डील - Realme GT 7 Pro 59,999 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आला होता, परंतु या Amazon सेलमध्ये 12,000 रुपयांची फ्लॅट सूट दिली जात आहे, ज्यामुळे फोनची किंमत 47,999 रुपयेपर्यंत खाली आली आहे.
advertisement
3/7
एवढंच नाही तर ग्राहक निवडक क्रेडिट कार्डे पेमेंट करत असतील तर त्यांना 1,439 रुपयांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅकही मिळू शकतं. या व्यतिरिक्त अॅमेझॉन या फोनवर नो-कॉस्ट ईएमआयचा ऑप्शनही देत आहे. ज्याची सुरुवात जवळपास 1,688 रुपये प्रति महिन्याने सुरु होते.
advertisement
4/7
ज्या यूझर्सजवळ जुना स्मार्टफोन आहे. ते एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन आणखी बचत करु शकतात. अमॅझॉननुसार एक्सचेंज व्हॅल्यू जास्तीत जास्त 42,250 रुपयांपर्यंत मिळू शकते. खरंतर ही तुमच्या जुन्या फोनच्या मॉडल, ब्रांड आणि कंडीशनवर अवलंबून असेल.
advertisement
5/7
रियलमी GT 7 प्रोचे खास फीचर्स : रियलमी GT 7 प्रोमध्ये 6.78-इंचचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीन HDR10+ आणि Dolby व्हिजन सपोर्टसह येते आणि याची पीक ब्राइटनेस 6,500 निट्सपर्यंत जाते. ज्यामुळे तीव्र उन्हातही स्कीन स्पष्ट दिसते.
advertisement
6/7
परफॉर्मेंससाठी, हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसरने सुसज्ज आहे. ज्यामुळे तो एक शक्तिशाली फ्लॅगशिप स्मार्टफोन बनतो. यात 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत, हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित Realme UI 6.0 वर चालतो.
advertisement
7/7
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये 50MP चा मेन कॅमेरा, 50MP चा टेलिफोटो सेन्सर आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड लेन्सचा समावेश आहे. तसंच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीसाठी यामध्ये 5,800mAh ची मोठी बॅटरी दिली गेली आहे. जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Realme चा भारी फोन 12 हजार रुपयांनी झाला स्वस्त! अ‍ॅमेझॉनवर मोठा इलेक्ट्रॉनिक सेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल