
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि संदिपान भुमरे हे दोघं एका लग्न समारंभात एकत्र आले होते. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अंबादास दानवे यांनी समृद्धी महामार्गाच्या जमिन संपादनातील मोबदला मिळवण्यासाठी बनावट हिबानामा केल्याचा आरोप संदिपान भुमरे यांच्यावर केला होता.आता कार्यक्रमादरम्यान ते दोघं एकमेकांच्या समोरासमोर आले आणि एकत्रच एकमेकांच्या जवळ बसले होते. त्यांनी मनमोकळ्या गप्पाही मारल्या.