TRENDING:

Lifestyle: भात शिजवण्याआधी तांदूळ किती वेळा धुवायचे, शिजवण्याची योग्य पद्धत काय?

Last Updated:
भारतातील मोठी लोकसंख्या जेवणात भात खाते. भात खाल्ल्याशिवाय अनेकांचं जेवण पूर्णच होत नाही. एकवेळ पोळी नसली तरी चालेल, पण भात लागतो. देशभरात ब्राउन व व्हाईट राईसचा वापर होतो. लोक आपल्या आवडीप्रमाणे भात शिजवतात.
advertisement
1/7

2/7
भात बनवण्याआधी तांदूळ धुवावे लागतात. पण ते किती वेळा धुवायचे ते खूप महत्त्वाचं आहे. खूपदा तांदूळ धुणाऱ्यांना त्यातील केमिकल एक-दोनदा धुतल्याने निघत नाहीत, असं वाटतं.
advertisement
3/7
जर्नल ऑफ हॅझार्डस मटेरिअल्समध्ये प्रकाशित 2021 च्या रिपोर्टनुसार, शिजवण्यापूर्वी तांदूळ धुतल्याने त्यातील मायक्रोप्लास्टिक्स निघून जातात, ज्याचा वापर पॅकेजिंग दरम्यान होतो. तांदूळ धुतल्याने 20 ते 30 टक्के मायक्रोप्लास्टिक्स कमी होतात. त्यामुळे तांदूळ धुवायचे कसे? तांदूळ उकळून त्याचे पाणी फेकून देणे योग्य आहे का? या प्रश्नांची उत्तरं एक्सपर्ट्सकडून जाणून घेऊयात.
advertisement
4/7
डाएटिशियन सुनीता त्रिपाठी यांच्या मते, भात शिजवण्यापूर्वी लोक मोठी चूक करतात. काही लोक तांदूळ बराच वेळ भिजवून ठेवतात आणि नंतर खूप वेळा धुतात. तांदूळ वारंवार धुतल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात.
advertisement
5/7
तांदळात असलेले विघटनशील फायबर पाण्यात विरघळते ज्यामुळे पचन सुधारते आणि शरीर निरोगी राहते. पण काही लोक जास्त पाण्यात तांदूळ उकळतात आणि नंतर ते पाणी गाळून फेकून देतात आणि उरलेला भात खातात, ते चुकीचं आहे.
advertisement
6/7
तांदूळ उकळून धुतल्याने त्यातील सर्व पोषण निघून जातं. भात शिजवताना या दोन चुका करत असाल तर त्या लगेच सुधारा. शिजवण्यापूर्वी तांदूळ 5-10 मिनिटं भिजत ठेवा आणि नंतर तांदूळ तीन वेळा धुवून शिजवा.
advertisement
7/7
भातापासून पूर्ण पोषण मिळवायचं असल्यास प्रेशर कुकरमध्ये तांदूळ जेवढं पाणी शोषू शकतील तेवढ्याच पाण्यात भात शिजवा. जास्त पाण्यात भात शिजवू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Lifestyle: भात शिजवण्याआधी तांदूळ किती वेळा धुवायचे, शिजवण्याची योग्य पद्धत काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल